Join us
Daily Top 2Weekly Top 5

कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 11:26 IST

Gold News: सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण देशात झपाट्याने वाढत असून, त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.  एका अहवालानुसार, डिसेंबर २०२५अखेर सुमारे १.४ कोटी कर्जदारांवर प्रत्येकी २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची सुवर्ण कर्जे थकीत आहेत.

नवी दिल्ली - सोन्यावर कर्ज घेणाऱ्यांचे प्रमाण देशात झपाट्याने वाढत असून, त्यामुळे चिंता निर्माण झाली आहे.  एका अहवालानुसार, डिसेंबर २०२५अखेर सुमारे १.४ कोटी कर्जदारांवर प्रत्येकी २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त रकमेची सुवर्ण कर्जे थकीत आहेत. विशेष म्हणजे, यातील बहुसंख्य कर्जदार आधीच इतर कर्जांच्या विळख्यात अडकलेले असून, हप्ते फेडताना त्यांची मोठी दमछाक होत असल्याचे विदारक चित्र आहे. 

 

१.४  कोटी लोकांवर २.५० लाख रुपयांपेक्षा अधिकच्या सोन्याच्या कर्जाचा बोजा आहे.१७.१ कोटींपर्यंत पोहोचली देशातील गोल्ड लोन खात्यांची संख्या. गोल्ड लोनचे मार्केट १६.२ लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Burdened by Debt, People Now Opt for Gold Loans: Risk Increases

Web Summary : India sees a rapid rise in gold loans, raising concerns. By December 2025, 1.4 crore borrowers will owe over ₹2.5 lakh each. Many are already struggling with existing debts, making repayment difficult. Gold loan accounts reach 17.1 crore, market exceeding ₹16.2 lakh crore.
टॅग्स :सोनंपैसा