शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २११ खासदारांनी विरोधात मतदान केले 
2
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
3
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
4
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
5
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
6
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
7
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
8
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
9
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
10
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
11
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
12
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
13
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
14
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
15
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
16
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
17
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
18
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
19
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
20
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:13 IST

"भाजप सत्तेत आली तर लोकांचे मांस-मच्छी खाणे बंद होईल," या ममता दीदींच्या आरोपाला त्यांनी थेट, कोण किती मांस खाऊ शकतो? याचीच स्पर्धा करण्याचेच चॅलेंज दिले.

आसाममधील विधानसभा निवडणुका आटोपून मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा आता थेट पश्चिम बंगालच्या मैदानात उतरले आहेत. बंगालमध्ये येताच त्यांनी 'मांस-मच्छी'च्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना थेट आव्हान दिले. "भाजप सत्तेत आली तर लोकांचे मांस-मच्छी खाणे बंद होईल," या ममता दीदींच्या आरोपाला त्यांनी थेट, कोण किती मांस खाऊ शकतो? याचीच स्पर्धा करण्याचेच चॅलेंज दिले.

तत्पूर्वी, ममता बॅनर्जी यांनी भाजपवर खाण्यापिण्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचा आरोप केला होता. यावर पलटवार करताना हिमंता बिस्वा सरमा म्हणाले, आसाममध्ये भाजपचे सरकार येऊन १० वर्षे झाली आहेत. तिथे कामाख्या मंदिरात आजही बळी दिला जातो आणि लोक मांस-मच्छीही खातात. ममता दीदी, तुम्ही आसामला या. आपण स्पर्धा करूया, कोण जास्त मांस खातो. आसामचा भाजप कार्यकर्ता २ किलो मटन खाऊ शकतो, टीएमसी वाले तेवढं खाऊ शकणार नाहीत."

हे मांस मात्र बंद करणार - हिमंता बिस्वा सरमा पुढे म्हणाले, बंगालमध्ये भाजप आल्यावर गोमांस आणि बांगलादेशात होणारी गायींची तस्करी नक्कीच बंद करणार. ममता दीदींना याच गोष्टीची भीती वाटत आहे. तसेच, टीएमसीचे लोक नेमके कोणते मांस खातात? याबद्दल मला शंका आहे, असा बोचरा टोलाही त्यांनी यावेळी ममतांना लगावला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Himanta Sarma challenges Mamata on meat consumption in Bengal election.

Web Summary : Himanta Biswa Sarma challenged Mamata Banerjee on meat consumption during Bengal elections, dismissing claims that BJP bans it. He questioned TMC's preferred meat, vowing to stop cow smuggling.
टॅग्स :West Bengal Assembly Election 2026पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२६Mamata Banerjeeममता बॅनर्जीBJPभाजपा