शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
4
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
5
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
6
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
7
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
8
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
9
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
10
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
11
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
12
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
13
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
14
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
15
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
16
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
17
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
18
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
19
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
20
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 22:09 IST

नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

- योगेश पांडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाशिक येथील ‘टीसीएस’मधील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण गाजत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. कॉर्पोरेट सेक्टरमध्ये असे प्रकार होत आहे हे वाईट आहे. मात्र मी अगोदर काम करत असलेल्या ॲक्सिस बॅंकेतदेखील अशा घटना घडल्या होत्या. मात्र योग्य वेळी तक्रारी झाल्याने संबंधित तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते, असे त्या म्हणाल्या. नागरिक विकास समितीतर्फे कविवर्य सुरेश भट सभागृहात शुक्रवारी नारी वंदन अधिनियम महिला बुद्धिजिवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी त्या बोलत होत्या.

कॉर्पोरेट क्षेत्रात असे प्रकार होत असल्याचे ऐकून मला वाईट वाटत आहे. ॲक्सिस बॅंकेत मी काम करत असतानादेखील अशी प्रकरणे झाली होती. मात्र व्हिसल ब्लोईंगमुळे अशा आरोपींनवर कायदेशीर कारवाई व कॉर्पोरेट कारवाई झाली होती. असे प्रकार झाले की तातडीने ते व्हिसल ब्लोईंगच्या माध्यमातून समाजाला सांगणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वरिष्ठांना ते कळविले पाहिजे. तरच हे प्रकार बंद होऊ शकतील, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. या कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, महापौर नीता ठाकरे, भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ.मनाली क्षीरसागर, विजया मारोतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

लव्ह जिहाद प्रकरण भयानकच, मुलींनी सावध राहण्याची गरजपरतवाडा येथील सेक्स स्कॅंडलच्या मुद्द्यावरदेखील अमृता फडणवीस यांनी भाष्य केले आहे. लव्ह जिहाद प्रकरण भयानकच असून मुलींनी सावध राहण्याची गरज आहे. लव्ह जिहादसारख्या प्रकरणांवर योग्य कारवाई होत आहे. परंतु आता मुलींनी जास्त सावध राहण्याची गरज आहे. आपली संस्कृती प्रेमाने फॉलो केली तर असं होणार नाही. आपल्या तरुणाईकडे स्वत:च्या वेद-पुराणांची बॅकिंग नाही. त्यामुळे ते संभ्रमित आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. भारतीय मूल्यसंस्कृती त्यांच्यापर्यंत पोहोचविले पाहिजे, असे अमृता फडणवीस म्हणाल्या. अशोक खरात प्रकरणदेखील भयानक आहे. खरातने त्याची बुद्धी व प्रभावा याचा उपयोग चुकीच्या गोष्टींसाठी केला आणि महिलादेखील त्याला बळी पडल्या याचे दु:ख वाटते. खरातला कठोर शिक्षा झाली पाहिजे असे प्रत्येक महिलेला वाटत आहे, असे त्या म्हणाल्या.

महिला आरक्षणाला काही लोकांचा विरोधराजकारणात महिलांचा सहभाग वाढण्याची आवश्यकता आहे व त्यासाठी ३३ टक्के आरक्षण आवश्यकच आहे. या आरक्षणाला काही लोक विरोध करत आहेत. मात्र महिलांना हक्काचा वाटा मिळणे आवश्यक आहे. महिलांचा या विधेयकाला पाठिंबा आहे, असे त्या म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Amruta Fadnavis reveals similar incidents occurred in Axis Bank too.

Web Summary : Amruta Fadnavis disclosed that Axis Bank also faced similar incidents of harassment like TCS. Timely complaints led to legal action. She emphasized reporting such cases promptly to superiors to prevent them. Fadnavis also addressed Love Jihad, stressing the need for girls to be cautious and connected to Indian culture. She supports women's reservation in politics.
टॅग्स :Amruta Fadnavisअमृता फडणवीसNashikनाशिक