शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
2
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
3
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
4
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
5
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
6
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
7
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
8
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
9
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
10
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
11
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
12
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
13
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
14
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
15
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
16
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
17
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
18
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
19
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
20
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
Daily Top 2Weekly Top 5

भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:19 IST

Nagpur Crime news: अमरावतीमधील परतवाडा येथील लैंगिक अत्याचार आणि व्हिडीओ व्हायरल प्रकरणासारखीच घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे. आरोपीने १९ वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. 

Sexual Abuse and Photo Video Viral: लग्नाचे आमिष दाखवून १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार तसेच तिचे अश्लील फोटो व व्हिडीओ क्लिप व्हायरल केल्याचा प्रकार उघड झाला. फोटो व व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्यासाठी त्याने तिच्याच स्नॅपचॅट आयडीचा उपयोग करणाऱ्या भिवापूर शहरातील आरोपीस उमरेड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने तिचे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ क्लिप तिच्याच नातेवाईक व मित्रमंडळींना पाठविले.

मोहम्मद जुनैद सादिक शेख (२६, रा. कोष्टीपुरा शाळेजवळ, भिवापूर) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पीडित तरुणी उमरेड येथील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहे. साधारणतः एक वर्षापूर्वी तिच्या स्नॅपचॅट आयडीवर आरोपी जुनैद शेख याची रिक्वेस्ट आली. 

स्नॅपचॅटवर मेसेज अन् दोघांची ओळख झाली

ही रिक्वेस्ट तिने स्वीकारल्यानंतर दोघांचेही स्नॅपचॅटवर चॅटिंग सुरू झाले. चॅटिंगदरम्यान आरोपी हा आपल्या नातेसंबंधातीलच असल्याची बाब तिला कळली. त्याच्यावर विश्वास ठेवत प्रत्येक गोष्टी शेअर झाल्या. तिच्या स्नॅपचॅटचा आयडीसुद्धा आरोपीला माहीत होता. स्नॅपचॅटच्या माध्यमातूनच दोघांची ओळख अधिक घट्ट झाली.

वर्षभरापूर्वी आरोपी जुनैद तरुणीला भेटण्यासाठी उमरेड येथे आला. कहांडला मार्गावरील एका हॉटेलमध्ये नेत तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, सहा महिन्यांपूर्वी तरुणीने जुनैदबाबत कुटुंबीयांना सांगितले. कुटुंबीयांनी नकार दिला. तेव्हापासून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले होते.

तरुणीला धमक्या देणे सुरू केले

आरोपी जुनैद शेख याच्याशी तरुणीने बोलणे बंद करताच तो चिडला. रूमवर भेटण्यासाठी ये, असा तगादाही त्याने सुरू केला. तिने भेटण्यास नकार दर्शविल्यानंतर आपल्या दोघांचेही फोटो आणि व्हिडीओ माझ्‌याकडे असून, ते तुझ्या कुटुंबीयांना, मित्र-मैत्रिणींना दाखवतो. तुझी बदनामी करतो, अशी धमकी तो वारंवार देऊ लागला.

पीडितेच्याच 'स्नॅपचॅट आयडी'वरून व्हायरल

२८ मार्च २०२६ रोजी आरोपी जुनैदने पुन्हा धमकीतंत्राचा वापर करीत उमरेड येथील एका दग्र्याजवळ तिला भेटण्यासाठी बोलावले. घराकडे परतल्यानंतर काही वेळातच तिच्या नातेवाइकाकडून स्नॅपचॅटवर अश्लील व्हिडीओ आल्याचे सांगितले. काही वेळातच व्हिडीओ डिलीट झाला.

त्यानंतर १३ एप्रिलला रात्री ८ ते ९ वाजेदरम्यान पुन्हा पीडितेच्या स्नॅपचॅट आयडीवरून आरोपी आणि तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्याची बाब समोर आली. अखेरीस तिने पोलिसांत तक्रार नोंदविली. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन जप्त केला आहे. त्याने यासाठी लॅपटॉपचा वापर केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

याप्रकरणी उमरेड पोलिसांनी पीडितेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ६४, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० सहकलम ६६ (ई), ६७ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक धनाजी जळक करीत आहेत.

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारीArrestअटक