शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 20:35 IST

Women's Reservation Bill defeated in Lok Sabha: लोकसभेत २/३ बहुमताअभावी महिला आरक्षण आणि परिसीमन विधेयक मंजूर होऊ शकले नाही. भाजप महिला खासदारांनी संसदेत आंदोलन सुरू केले असून उद्यापासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.

केंद्र सरकारने २०२९ च्या निवडणुकांसाठी मास्टरस्ट्रोक समजले जाणारे महिला आरक्षण आणि परिसीमन दुरुस्ती विधेयक लोकसभेत २/३ बहुमताअभावी पडले आहे. ५२८ खासदारांनी मतदान केलेल्या या प्रक्रियेत सरकारला विजयासाठी ३५२ मतांची गरज होती, मात्र केवळ २९८ मते मिळाल्याने हे विधेयक ५४ मतांनी फेटाळले गेले. मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या सत्तेत पहिल्यांदाच सरकार एखादे विधेयक सभागृहात संमत करू शकले नाही. यामुळे भाजप महिला खासदारांनी संसदेत आंदोलन सुरू केले असून उद्यापासून देशव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे.   

संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामाविधेयक पडल्यानंतर संतप्त झालेल्या भाजप आणि एनडीएच्या महिला खासदारांनी संसदेच्या 'मकर द्वार' येथे विरोधकांविरुद्ध जोरदार निदर्शने केली. "विरोधकांनी नारी शक्तीचा अपमान केला आहे," अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. एनडीएचे कार्यकर्ते उद्या, १८ एप्रिलपासून 'इंडिया' आघाडीतील नेत्यांच्या घराबाहेर तीव्र निदर्शने करणार आहेत.

NDA नेत्यांची तातडीची बैठकया पराभवानंतर संसदेतच एनडीएच्या फ्लोअर लीडर्सची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. जेपी नड्डा, किरण रिजिजू, श्रीकांत शिंदे, अनुप्रिया पटेल आणि इतर मित्रपक्षांचे नेते पुढील रणनीती ठरवत आहेत.

का पडले विधेयक? (आकडेवारीचे गणित)सभागृहात एकूण ५४० खासदार असताना ५२८ जणांनी मतदान केले.

विधेयकाच्या बाजूने: २९८ मते

विधेयकाच्या विरोधात: २३० मते

निकाल: २/३ बहुमतासाठी ३५२ मतांची आवश्यकता होती. ५४ मते कमी पडल्याने विधेयक फेटाळले गेले.

यासोबतच परिसीमन दुरुस्ती आणि केंद्रशासित प्रदेश कायदा दुरुस्ती ही दोन्ही लिंक केलेली बिलेही आता अधांतरी आहेत. पहिले विधेयक पडल्याने उर्वरित दोन विधेयके मांडण्यात आली नाहीत. गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या भाषणात आधीच इशारा दिला होता की, जर ही बिले पडली तर त्याला पूर्णपणे विरोधी पक्ष जबाबदार असेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi Government Suffers First Major Setback: Women MPs Protest Bill Failure

Web Summary : The women's reservation bill failed in Lok Sabha due to insufficient votes. BJP women MPs protested in Parliament, calling for nationwide action. NDA leaders are strategizing after the defeat, blaming the opposition. Linked bills are also now uncertain.
टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणlok sabhaलोकसभाBJPभाजपाcongressकाँग्रेस