शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 21:37 IST

Women's Reservation Bill 2026 rejected: लोकसभेत २/३ बहुमताअभावी महिला आरक्षण संविधान दुरुस्ती विधेयक फेटाळले गेले आहे. मुख्य विधेयक पडल्यामुळे सरकारने परिसीमन आणि केंद्रशासित प्रदेशांशी संबंधित इतर दोन बिलेही मागे घेतली आहेत.

नवी दिल्ली: २०२९ च्या लोकसभा निवडणुकांसाठी लोकसभेच्या जागा वाढवून महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचे केंद्र सरकारचे स्वप्न सध्या तरी धुसर झाले आहे. लोकसभेत शुक्रवारी झालेल्या मतदानादरम्यान 'संविधान (१३१ वे) दुरुस्ती विधेयक २०२६' आवश्यक असलेल्या दोन-तृतीयांश बहुमताअभावी मंजूर होऊ शकले नाही. या ऐतिहासिक पराभवानंतर सरकारने या विधेयकाशी संबंधित असलेले इतर दोन महत्त्वाचे कायदेही मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

लोकसभेत या विधेयकावर मतदान झाले तेव्हा विधेयकाच्या बाजूने २९८ मते तर विधेयकाच्या विरोधात २३० मते पडली. घटनादुरुस्तीसाठी किमान ३५२ (२/३) मतांची गरज होती. सरकारला बहुमतासाठी ५४ मते कमी पडल्याने हे विधेयक फेटाळले गेले.

इतर दोन विधेयकांचे काय झाले?या मुख्य विधेयकासोबतच सरकारने 'परिसीमन विधेयक, २०२६' आणि 'संघ राज्य विधी (संशोधन) विधेयक, २०२६' देखील चर्चेसाठी ठेवले होते. मात्र, मुख्य घटनादुरुस्ती विधेयकच पडल्यामुळे संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी घोषणा केली की, सरकार आता ही दोन्ही उर्वरित बिले पुढे नेणार नाही.

रिजिजू म्हणाले, "विरोधकांनी महिलांना सन्मान देण्याची मोठी संधी गमावली आहे. मुख्य संविधान दुरुस्ती विधेयकच बहुमताने मंजूर होऊ शकले नसल्याने, त्याशी संबंधित इतर दोन विधेयकांवर चर्चा करण्याचा प्रश्नच उरत नाही."

अमित शाह काय म्हणाले...या पराभवानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी संताप व्यक्त केला असून, काँग्रेससह 'इंडिया' आघाडीतील घटक पक्षांनी महिलांचा अधिकार हिरावून घेतल्याचा आरोप केला आहे. "हा नारी शक्तीचा अपमान असून याचे परिणाम विरोधकांना आगामी निवडणुकीत भोगावे लागतील," असा इशारा त्यांनी दिला आहे. आज लोकसभेत एक अतिशय विचित्र दृश्य दिसले. नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी आवश्यक असलेले संविधान दुरुस्ती विधेयक काँग्रेस, टीएमसी, डीएमके आणि समाजवादी पक्षाने मंजूर होऊ दिले नाही. महिलांच्या हक्काचे विधेयक पाडून त्याचा जल्लोष करणे हे अत्यंत निंदनीय आणि कल्पनेपलीकडचे आहे. आता देशातील महिलांना लोकसभा आणि विधानसभेत ३३% आरक्षण मिळू शकणार नाही, जो त्यांचा हक्क होता. काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी हे पहिल्यांदाच केलेले नाही, तर ते वारंवार असेच वागत आले आहेत. नारी शक्तीच्या अपमानाची ही बाब इथेच थांबणार नाही, तर ती दूरपर्यंत जाईल. विरोधकांना 'महिलांचा आक्रोश' केवळ २०२९ च्या लोकसभा निवडणुकीतच नाही, तर प्रत्येक स्तरावर आणि प्रत्येक निवडणुकीत सहन करावा लागेल, असे शाह म्हणाले.

पडण्यामागचे मुख्य कारण 'परिसीमन'दक्षिण भारतीय राज्यांनी या विधेयकातील परिसीमनाच्या अटीला तीव्र विरोध दर्शवला होता. लोकसभेच्या जागा वाढवल्यास उत्तरेकडील राज्यांचे वर्चस्व वाढेल, या भीतीने २३० खासदारांनी एकत्र येऊन विधेयकाच्या विरोधात कौल दिला. मोदी सरकारसमोर १२ वर्षांनी एवढी मोठी नामुष्की ओढविली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Women's Reservation Bill Fails; Other Bills Withdrawn: What Happened?

Web Summary : Women's reservation bill failed in Lok Sabha due to lack of majority. Government withdrew delimitation and related bills. Opposition opposed delimitation clause fearing northern dominance. Amit Shah criticizes opposition.
टॅग्स :Women Reservationमहिला आरक्षणlok sabhaलोकसभाBJPभाजपा