Join us
Daily Top 2Weekly Top 5

विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:11 IST

Meta Layoff: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी 'मेटा' पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कंपनीनं २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल आणि सुमारे ६० अब्ज डॉलर्सचा प्रचंड नफा कमावला असताना ही कपात केली जात आहे.

Meta Layoff: फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपची मूळ कंपनी 'मेटा' पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी कंपनीनं २०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त महसूल आणि सुमारे ६० अब्ज डॉलर्सचा प्रचंड नफा कमावला असताना ही कपात केली जात आहे. रॉयटर्सच्या अहवालानुसार, प्रचंड नफा होऊनही मार्क झुकरबर्गची कंपनी आता माणसांपेक्षा आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (AI) वर जास्त भर देत आहे. यापूर्वी २०२२-२३ मध्येही मेटानं २१,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं होतं.

२० मे पासून प्रक्रियेला सुरुवात

मेटा मधील ही कर्मचारी कपात २० मे पासून सुरू होण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी आपल्या जागतिक वर्कफोर्समध्ये सुमारे १०% कपात करेल, याचा अर्थ सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. मात्र, हे संकट इथेच थांबत नाही; वर्षाच्या अखेरीपर्यंत ही कपात २०% पर्यंत जाऊ शकते, ज्यामुळे १६,००० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जाऊ शकतात.

Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?

कंपनी नफ्यात असतानाही निर्णय का?

सामान्यतः जेव्हा कंपनी तोट्यात असते तेव्हा कर्मचारी कपात केली जाते, परंतु मेटाच्या बाबतीत परिस्थिती वेगळी आहे. कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग आता 'इयर ऑफ एफिशिएन्सी'च्या (Year of Efficiency) पुढे जाऊन 'एआय फर्स्ट' (AI First) या व्हिजनवर काम करत आहेत. झुकरबर्ग AI तंत्रज्ञानावर शेकडो अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करत आहेत जेणेकरून कंपनीच्या कामकाजाची पद्धत पूर्णपणे बदलता येईल. मेटा व्यवस्थापनाचं असं मानणं आहे की, AI च्या वापरामुळे आता कमी कर्मचाऱ्यांसह जास्त काम आणि चांगली कार्यक्षमता मिळवता येईल.

AI ठरतोय नोकऱ्यांचा शत्रू

AI च्या नावाखाली कर्मचाऱ्यांना काढणारी मेटा ही एकमेव कंपनी नाही. अलीकडेच ई-कॉमर्स क्षेत्रातील दिग्गज कंपनी ॲमेझॉननंही आपल्या सुमारे ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. फिनटेक कंपनी 'ब्लॉक इंक'नं आपली वर्कफोर्स जवळपास निम्मी केली आहे. या सर्व कंपन्यांचा युक्तिवाद एकच आहे की AI मुळे कार्यक्षमता वाढली आहे, त्यामुळे  कर्मचाऱ्यांची गरज कमी झालीये. Layoffs.fyi च्या आकडेवारीनुसार, या वर्षात आतापर्यंत ७३,००० पेक्षा जास्त टेक कर्मचाऱ्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Profitable Meta to Lay Off Staff; 16,000 Jobs at Risk

Web Summary : Despite huge profits, Meta plans further layoffs, impacting up to 16,000 employees. The shift towards AI is driving the decision, following previous cuts. Meta will invest heavily in AI for efficiency, reducing workforce needs, mirroring trends in other tech giants like Amazon.
टॅग्स :फेसबुकनोकरी