शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:42 IST

वैशाख शब्द उच्चारताच वैशाख वणवा शब्द आणि उन्हाच्या झळा आठवतात, मात्र या महिन्यात येणारे सण मनाला शीतलता प्रदान करतात, कसे ते पाहू. 

हिंदु पंचांगानुसार चांद्रवर्षाचा हा दुसरा महिना. 'धर्मबोध' या ग्रंथात ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी वैशाखाचे सुंदर वर्णन केले आहे. या महिन्याची पौर्णिमा विशाखा नक्षत्राने युक्त असते अथवा विशाखा नक्षत्र पौर्णिमेच्या आधी वा नंतर असते, म्हणून या महिन्याला `वैशाख' असे म्हणतात. या मासातही उत्तरायण असते. या मासाचे प्राचीन काळातील प्रचलित नाव `माधव' असे आहे. ज्ञानदेवांनी ज्ञोश्वरीत या `माधव' चा उल्लेख `माधवी' असा केला आहे. 

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!

'ना तरि उद्यानी माधवी घडे। ते वनशोभेची खाणि उघडे।'

अर्थात जसा वसंतऋतूच्या आगमनाने उपवनात सर्व वृक्षवल्लींना बहर येतो, वनश्रीचे भांडार उघडते, चैत्राप्रमाणेच हा महिनादेखील वसंतऋतूचा मास म्हणून ओळखला जातो. प्रसन्नतेचे शितल शिंपण करणारा हा ऋतू! अण्णासाहेब किर्लोस्करांच्या `सौभद्र या सदाबहार नाटकातील-

वैशाखमासि वासंतिक समय शोभला,आम्रासव पिउनि गान करिती कोकिला।

या गीतातून या प्रसन्नतेचे यथार्थ वर्णन आले आहे. निसर्गातील प्रसन्नता मनाला प्रसन्न करते. ही प्रसन्नता अधिकाअधिक वृद्धित करण्याचे महन्मंगलकार्य धर्म करत असतो. याचे सुंदर उदाहरण म्हणून वैशाख मासातील धर्मकृत्यांकडे पाहता येईल. यावेळी उन्हाळ्याची प्रखरता जाणवू लागलेली असते. अशावेळी पाण्याशी संबंधित अशी व्रतवैकल्ये या महिन्यात येजलेली दिसतात.

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 

प्रात:स्नानासाठी प्रशस्त मानल्या गेलेल्या महिन्यांमध्ये हा महिना येता़े . गाईची नित्यपूजाही या महिन्यात केली जाते. वैशाख हा जेव्हा अधिक महिना असतो, त्यावेळी या अधिक महिन्यात काम्यकर्म समाप्तीचा निषेध सांगितलेला आहे. म्हणजे कुठल्याही काम्यव्रताची सांगता या अधिकमासात करू नये. मात्र अधिक वैशाखमास आणि निज वैशाखमास या दोन्हीमध्ये प्रात:स्नान करण्याची प्रथा आहे.

शिखांचे गुरु गोविंदसिंग यांनी वैशाख शुक्ल प्रतिपदेला `खालसा' ची स्थापना केली. त्यामुळे या दिवशी पंजाब राज्यामध्ये `वैशाखी' चा उत्सव अतिशय उत्साहात साजरा केला जातो.

वैशाख शुक्ल सप्तीला गंगा जन्हुच्या कानातून बाहेर पडली म्हणून हा दिवस 'गंगासप्तमी' नावाने ओळखला जातो. बंगालमध्ये वैशाख शुक्ल नवमीला 'सीता नवमी' म्हणतात. कारण जनकाला भूमी नांगरताना या दिवशी सीता सापडली, असे मानले जाते. त्याची आठवण म्हणून या दिवशी शेतकऱ्यांना मदत करण्याची प्रथा आहे. प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र शुक्ल नवमीचा तर सीतामाईचा वैशाख शुक्ल नवमीचा. स्त्री-पुरुष समानता आपल्या पूर्वजांनाही मान्य होती, त्याचेच हे सुंदर उदाहरण! आद्यशंकराचार्यांच्या जयंतीमुळे वैशाखाची दशमी तिथी परमपवित्र ठरली आहे. तर वैशाख पौर्णिमेला `बुद्धजयंती' असते. वैशाख पौर्णिमेला वेद प्रकटले अशी आपली श्रद्धा आहे म्हणून या दिवशी अनेक मंडळी वेदांची पूजा करतात. बंगाली स्त्रिया वैशाख मासात अश्वत्थवृक्षाची म्हणजेच पिंपळाची पूजा करतात. सुख शांतीसाठी केल्या जाणाऱ्या या व्रताला `अश्वत्थपट व्रत' म्हणतात. 

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!

रखरखत्या उन्हाळ्यात प्रसन्नतेचे शिंपण करणारा असा हा वैशाख मास आजपासून अर्थात १८ एप्रिलपासून पासून सुरू होत आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Vaishakh begins! Know religious significance of Ganga Saptami to Buddha Jayanti.

Web Summary : Vaishakh, the second month of the Hindu calendar, is auspicious for religious observances. From Ganga Saptami to Buddha Jayanti, it's a time for piety, charity, and seeking spiritual growth amidst the summer heat. Special observances like worshipping the Peepal tree are also observed.
टॅग्स :Indian Festivalsभारतीय उत्सव-सणBuddha Purnimaबुद्ध पौर्णिमा