Join us
Daily Top 2Weekly Top 5

...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा

Shaheen Afridi Vial Video: शाहीन आफ्रिदीच्या 'त्या' वागण्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:07 IST

Open in App

पाकिस्तान सुपर लीग २०२६ मध्ये 'लाहोर कलंदर्स'ची निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. सलग पराभवांच्या दबावामुळे कर्णधार शाहीन आफ्रिदी याचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या सामन्यात स्वस्तात बाद झाल्यानंतर शाहीनने रागाच्या भरात आपली बॅट जोरात आदळली, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

क्वेटा ग्लॅडिएटर्सविरुद्धच्या सामन्यात लाहोरच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. स्वतः कर्णधार शाहीन आफ्रिदीलाही फलंदाजीमध्ये कमाल करता आली नाही. तो उस्मान तारिकच्या गोलंदाजीवर खातेही न उघडता झेलबाद झाला. शून्यावर बाद होऊन तंबूत परतताना शाहीन प्रचंड संतापलेला दिसला. सीमारेषा ओलांडताच त्याने आपली बॅट 'साइट स्क्रीन'च्या टायरवर जोरात आपटली. एवढ्यावरच न थांबता, ड्रेसिंग रूमच्या पायऱ्या चढतानाही त्याने पुन्हा बॅट आदळली.  शाहीन आफ्रिदीचा हा आक्रमक अवतार आणि संघाची घसरलेली कामगिरी पाहता, लाहोर कलंदर्स पुढील सामन्यांत पुनरागमन करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

या सामन्यात क्वेटाच्या गोलंदाजांनी लाहोरच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले.उस्मान तारिकने ४ षटकांत केवळ १८ धावा देत अब्दुल्ला शफीक, शाहीन आफ्रिदी, सिकंदर रझा हे ३ महत्त्वाचे विकेट्स घेतले. जहानदाद खानने ३ विकेट्स घेतले. तर, अल्झारी जोसेफने २ विकेट्स मिळवले. या भेदक माऱ्यामुळे लाहोरचा संघ निर्धारित षटकांत केवळ १३४ धावा करू शकला. सौद शकीलच्या नेतृत्वाखालील क्वेटा ग्लॅडिएटर्सने हे आव्हान अवघ्या १६.२ षटकांत ६ विकेट्स राखून सहज पूर्ण केले.

टॅग्स :ऑफ द फिल्डपाकिस्तानव्हायरल व्हिडिओ