शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
4
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
5
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
6
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
7
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
8
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
9
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
10
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
11
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
12
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
13
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
14
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
15
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
16
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
17
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
18
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
19
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
20
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
Daily Top 2Weekly Top 5

"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!

By सुदाम देशमुख | Updated: April 18, 2026 09:57 IST

संगमनेरच्या वडगावपान येथील भोंदू गडगे बाबाला पोलिसांनी केली अटक

संगमनेर : कर्करोगासारखे दुर्धर आजार मंत्राने, दैवीशक्तीने बरे करतो, मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो. घरातील सर्व समस्या मंत्रशक्तीद्वारे बऱ्या करतो. असे सांगून लोकांकडून रुपये उकळणाऱ्या भोंदू गडगे बाबाला पोलिसांनी अटक केली आहे. गडगे विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीने तक्रार अर्ज दिला होता, त्यानंतर संबंधितांनी सोशल मीडियात अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हिडिओ शेअर केला होता. 

भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे,  डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे (तिघेही रा. वडगावपान, ता. संगमनेर) आणि सूरज शिंदे, मधूकर शिंदे (दोघेही रा. रहिमपूर, ता. संगमनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच जणांची नावे आहेत, त्यांच्याविरोधात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या बुवाबाजी संघर्ष विभागाच्या राज्य सचिव ॲड. रंजना पगार-गवांदे यांनी फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर श्रीरामपूर उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मागदर्शनाखाली संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे आणि त्यांच्या पथकाने भोंदू महाराज राजेंद्र बापू गडगे याला वडगाव पान येथून ताब्यात घेत अटक केली.  संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथील गडगे बाबाच्या भोंदूगिरीबाबत राज्यभरातून अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे तेथील चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक, संगमनेर उपविभागीय अधिकारी तसेच संगमनेर उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्याकडे केली आहे. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीची बदनामी करणारा व्हिडिओ सोशल मीडियात शेअर करण्यात आला होता. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३चे कलम ३सह ड्रग्स ॲण्ड मॅजिक रेमिडिज ॲक्ट १६५४ चे कलम ७ मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्टचे कलम ३३.३६ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण साळुंखे करीत आहेत.

टॅग्स :Ahilyanagarअहिल्यानगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस