Join us
Daily Top 2Weekly Top 5

IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?

Gerald Coetzee: डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड पेनच्या हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:23 IST

Open in App

आयपीएल २०२६ च्या हंगामात खेळाडूंच्या दुखापतींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाहीये. आता सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा धक्का बसला असून, त्यांचा डावखुरा वेगवान गोलंदाज डेव्हिड पेन दुखापतीमुळे उर्वरित स्पर्धेतून बाहेर पडला. मात्र, हैदराबादने तातडीने हालचाली करत त्याच्या जागी दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक वेगवान गोलंदाज जेराल्ड कोएत्झी याचा संघात समावेश करण्यात आला आहे.

आयपीएलने जारी केलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकानुसार, डेव्हिड पेनला घोट्याच्या दुखापतीमुळे या हंगामाला मुकावे लागले. पेनने या हंगामात हैदराबादसाठी २ सामने खेळले असून त्यात २ विकेट्स मिळवले होते. त्याच्या जागी आता कोएत्झी २ कोटी रुपयांच्या करारासह ऑरेंज आर्मीमध्ये सामील झाला आहे.

जेराल्ड कोएत्झीसाठी हैदराबाद हा आयपीएलमधील तिसरा संघ ठरेल. जेराल्ड कोएत्झीने २०२४ मध्ये मुंबईकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्याने १० सामन्यात १३ विकेट्स घेत आपली छाप पाडली. त्यानंतर २०२५ मध्ये मेगा ऑक्शनमध्ये गुजरातने त्याला २.४ कोटी रुपयांना खरेदी केले. मात्र, तेथे त्याला केवळ ४ सामन्यांत संधी मिळाली, ज्यात त्याने २ विकेट्स घेतले. कोएत्झीने आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेसाठी ४ कसोटी, १४ वनडे आणि १८ टी-२० सामने खेळले असून, त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एकूण ६७ विकेट्स आहेत. त्याच्या वेगामुळे हैदराबादच्या गोलंदाजीला अधिक धार येण्याची शक्यता आहे.

सनरायझर्स हैदराबादची कामगिरी

सनरायझर्स हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहे. त्यांनी पाचपैकी दोन सामने जिंकले असून तीन सामन्यांत त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आज हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर त्यांचा सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रंगणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : IPL 2026: Coetzee replaces injured Payne in Sunrisers Hyderabad squad.

Web Summary : Gerald Coetzee replaces injured David Payne in Sunrisers Hyderabad. Payne's ankle injury forces him out. Coetzee previously played for Mumbai, Gujarat, bringing pace to Hyderabad's bowling attack. He joins for ₹2 crore. Hyderabad is currently fifth in the standings.
टॅग्स :सनरायझर्स हैदराबादआयपीएल २०२६ऑफ द फिल्ड