By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 10:49 IST
1 / 6अक्षय्य तृतीया म्हणजे सुख-समृद्धी आणि अक्षय फळ देणारा दिवस. यंदा रविवार, १९ एप्रिल २०२६ रोजी हा सण साजरा होत आहे. या दिवशी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते, त्यामुळे सराफा बाजारात मोठी गर्दी असते. मात्र, घाईघाईत किंवा भावनेच्या भरात सोने खरेदी करताना ग्राहकांकडून काही गंभीर चुका होतात. तुमचे कष्टाचे पैसे योग्य ठिकाणी गुंतवले जावेत यासाठी या ५ गोष्टी लक्षात ठेवा.2 / 6तुम्ही भविष्यातील लाभासाठी सोने घेत असाल, तर जड दागिने घेणे टाळा. २४ कॅरेटची सोन्याची नाणी, वेढे किंवा ‘सोव्हरन गोल्ड बाँड्स’ हा उत्तम पर्याय आहे.3 / 6नेहमी ‘बीएआयस हॉलमार्क’ असलेलेच सोने खरेदी करा. दागिन्यांवर ‘एचयूआयडी’ क्रमांक असल्याची खात्री करा. यामुळे तुमच्या सोन्याची पूर्ण माहिती सरकारकडे नोंद होते.4 / 6अनेक ज्वेलर्स ‘झीरो मेकिंग चार्जेस’च्या जाहिराती करतात. अशा वेळी सोन्याचा प्रति ग्रॅम दर तपासा किंवा ‘वेस्टेज चार्जेस’ (तूट) जास्त लावले जात नाहीत ना याची खात्री करा.5 / 6सोने परत विकताना वा बदलून घेताना किती पैसे कापले जातील, हे विचारून घ्या. नामांकित ज्वेलर्स त्यांच्याकडून घेतलेल्या सोन्यावर चांगला परतावा देतात.6 / 6अक्षय्य तृतीया आहे म्हणून ऐपतीपेक्षा जास्त सोने खरेदी करू नका. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या एकूण गुंतवणुकीच्या केवळ १० ते १५ टक्के रक्कम सोन्यात असावी.