By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:18 IST
1 / 10अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मातील अत्यंत शुभ दिवस मानला जातो. या दिवशी नवीन वाहन खरेदी केले जाते. या दिवशी मुहूर्त बघण्याची गरज नसते कारण हा दिवस शुभ मानला जातो. त्यामुळे लोक निर्धास्तपणे नवीन कार किंवा बाईक घेतात. तुम्हीही बाइक घ्यायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. 2 / 10भारतीय बाजारपेठेतील सर्वाधिक विकली जाणारी स्कूटर होंडा ॲक्टिव्हाचे दोन मॉडेल्स आहेत. ११० सीसी सेगमेंटमध्ये ॲक्टिव्हा ६जी आणि १२५ सीसी सेगमेंटमध्ये ॲक्टिव्हा १२५. आज आम्ही तुम्हाला होंडा ॲक्टिव्हा ६जी च्या फायनान्स डिटेल्सबद्दल सांगणार आहोत, जिचे एकूण ४ व्हेरिएंट्स आहेत. 3 / 10होंडा ॲक्टिव्हा ६जी ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ७५,५८३ रुपये आहे आणि टॉप व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ९०,३३२ रुपये आहे. होंडा ॲक्टिव्हा भारतीय बाजारपेठेतील स्कूटर सेगमेंटमध्ये बऱ्याच काळापासून अव्वल स्थानावर आहे आणि गेल्या मार्च महिन्याच्या ३१ दिवसांत २,५९,७६० ग्राहकांनी ती खरेदी केली, जी मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ३७% वाढ आहे.4 / 10युवा, वृद्ध तसेच मुली आणि महिलांमध्ये लोकप्रिय असलेल्या या स्कूटरला १०९.५१ cc इंजिन दिले आहे. जे ७.९९ PS पॉवर आणि ९.०५ Nm टॉर्क निर्माण करते. तिचे मायलेज ५९.५ किमी प्रतिलीटर पर्यंत आहे आणि यात आरामदायक सीट, चांगली स्टोरेज जागा आणि स्मार्ट फीचर्स देखील मिळतात. 5 / 10जर तुम्ही होंडा ॲक्टिव्हा 6G फायनान्स करण्याचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला तिच्या स्टँडर्ड, डिलक्स, २५ वी ॲनिव्हर्सरी एडिशन आणि एच-स्मार्ट व्हेरिएंट्ससाठी कर्ज आणि EMI सह सर्व तपशील देऊ.6 / 10भारतीय बाजारपेठेत जर तुम्हाला कमी किमतीत एक विश्वासार्ह स्कूटर हवी असेल तर होंडा ॲक्टिव्हा 6G चा स्टँडर्ड व्हेरिएंट (Honda Activa 6G STD) चांगला पर्याय आहे. याची एक्स-शोरूम किंमत ७५,५८३ रुपये आणि ऑन-रोड किंमत ९०,००० रुपये आहे.7 / 10जर तुम्ही २०,००० रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला ७०,००० रुपयांचे बँक कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही ८% व्याजदराने ३ वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला पुढील ३६ महिन्यांसाठी २,१९४ रुपयांचा EMI भरावा लागेल. या संपूर्ण कालावधीत तुम्हाला जवळपास ९,००० रुपये व्याज द्यावे लागेल.8 / 10होंडा ॲक्टिव्हा 6G च्या दुसऱ्या सर्वात स्वस्त व्हेरिएंट, २५वी ॲनिव्हर्सरी एडिशनची एक्स-शोरूम किंमत ८५,००० रुपये आणि ऑन-रोड किंमत ९८००० रुपये आहे. यात २० हजार डाउन पेमेंट करून हे व्हेरिएंट फायनान्स केल्यास ७८ हजारचे बँक कर्ज मिळेल. ३ वर्षांचा कर्ज कालावधी आणि ८% व्याजदर लक्षात घेता पुढील ३६ महिन्यांसाठी २,४४४ हजार EMI भरावा लागेल. वरील अटींनुसार या स्कूटरवर जवळपास १० हजार रुपये व्याज लागेल.9 / 10होंडा ॲक्टिव्हा 6G DLX व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ८५ हजार ८६० इतकी आहे आणि ऑन-रोड किंमत १ लाख १ हजार ६५९ रूपये आहे. यासाठी २० हजार रुपयाचे डाउन पेमेंट आणि ८१ हजार ६५९ रुपयाचे फायनान्सिंग कर्ज उपलब्ध असेल. ८% व्याजदराने तीन वर्षांच्या कर्जाचा मासिक हप्ता २,५५९ इतका असेल आणि त्याची परतफेड पुढील ३६ महिन्यांत केली जाईल. या व्हेरिएंटसाठी तुम्हाला तीन वर्षांत व्याजापोटी १० हजार ४६१ रुपये मोजावे लागतील.10 / 10होंडा ॲक्टिव्हा 6G च्या टॉप व्हेरिएंट ॲक्टिव्हा एच-स्मार्टची एक्स-शोरूम किंमत ९०,३३२ रूपये आणि ऑन-रोड किंमत १ लाख ६ हजार ५४३ रुपये आहे. जर तुम्ही ही स्कूटर २० हजार रुपयांच्या डाउन पेमेंटसह फायनान्स केली तर तुम्हाला ८६,५४३ रूपये कर्ज मिळेल. ३ वर्षांच्या कर्जाच्या मुदतीसह आणि ८% व्याजदराने तुम्हाला पुढील ३६ महिन्यांत २ हजार ७१२ रूपये EMI भरावा लागेल. वरील अटींसह या स्कूटरवरील एकूण व्याज ११ हजार ८७ रूपये इतके असेल.