Sindhu Tai Sapkal: पुण्यातील ठोसर पागेत शासकीय इतमामात 'सिंधुताई सपकाळ' यांना अखेरचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2022 02:53 PM2022-01-05T14:53:57+5:302022-01-05T14:59:25+5:30

अनाथांची माय सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे काल पुण्यात निधन झाले. गॅलेक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अशा अचानक सोडून जाण्याने संपूर्ण देशभरात हळहळ व्यक्त होत आहे. राजकीय नेते, अभिनेते, सिंधुताईंच्या संपर्कातील हजारो व्यक्तींना एक धक्काच बसला आहे. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याबरोबरच अनेकांनी त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून भावनिक पोस्टद्वारे श्रद्धांजली वाहिली. आज दुपारी पुण्यातील ठोसर पागेत शासकीय इतमामात 'सिंधुताई सपकाळ' यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पुण्यातील नेतेमंडळी, साहित्यिक, असंख्य तरुण तरुणी यावेळी उपस्थित होते. सिंधुताईंना अखेरचा निरोप देताना नागरिक भावुक झाल्याचे यावेळी दिसून आले. ( सर्व छायाचित्रे :- तन्मय ठोंबरे )