SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?

उर्वरित एका जागेसाठी पाच संघांमध्ये चुरस

By सुशांत जाधव | Updated: May 18, 2026 23:49 IST2026-05-18T23:48:12+5:302026-05-18T23:49:46+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs SRH Sunrisers Hyderabad won by 5 wkts Enter They along with GT have qualified for the playoffs | SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?

SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?

SRH Qualified For Playoffs Along With GT What About CSK : ईशान किशनच्या शानदार खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादच्या संघाने चेपॉकच्या घरच्या मैदानात खेळणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सला पराभवाचा धक्का दिला. या विजयासह SRH च्या संघाने प्लेऑफ्समध्ये एन्ट्री मारलीच. पण या निकालासह गुजरात टायटन्सच्या रुपात प्लेऑफ्सचा तिसरा संघही मिळाला आहे. आता उर्वरित एका जागेसाठी पाच संघात स्पर्धा उरली आहे. यात चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली कॅपिटल्ससाठीची लढाई ही 'जर तर'ची असून राजस्थान रॉयल्स, पंजाब किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्सचा संघ एक पाऊल पुढे आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

अर्धशतकाशिवाय संपला CSK चा डाव

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने चेपॉकच्या मैदानात नाणेफेक जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण त्याचा हा निर्णय चांगलाच फसला. संजू सॅमसन १३ चेंडूत २७ धावा करून परतल्यावर उर्विल पटेल याने ८ चेंडूत १३ धावा करत तंबूचा रस्ता धरला. कार्तिक शर्मानंही चांगली सुरुवात मिळाल्यावर १९ चेंडूत ३२ धावा करून मैदान सोडले. धावांसाठी संघर्ष करणारा ऋतुराज गायकवाडच्या रुपात चेन्नईच्या संघाने चौथी विकेट गमावली. त्याने २१ चेंडूचा सामना करून फक्त १५ धावांची भर घातली. अखेरच्या षटकात डेवॉल्ड ब्रेविस याने २७ चेंडूत केलेल्या ४४ धावा आणि शिवम दुबेच्या २३ चेंडूतील २६ धावांसह प्रशांत वीर ११ (९) आणि अकिल हुसेन ३ (१)* यांनी निर्धारित २० षटकात ७ विकेट्सच्या मोबदल्यात धावफलकावर १८० धावा लावल्या. 

CSK vs SRH : संजूनं विकेटमागे दाखवली MS धोनीसारखी चपळाई; मग क्लासेनसोबत झाली तू-तू मै-मै! (VIDEO)

ईशानचा शानदार शो! क्लासेनचाही दिसला क्लास अन् SRH नं मारली बाजी

चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना ट्रॅविस हेडनं ६ चेंडूत ६ धावांवर आपली विकेट गमावली. अभिषेक शर्मा २१ चेंडूत ३ चौकार आणि १ षटकार मारून २६ धावांवर बाद झाला. संघ अडचणीत असताना ईशान किशन आणि क्लासेन जोडी जमली. क्लासेन २६ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ४७ धावा करून परतल्यावर ईशान किशनने ४७ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७० धावा करत सामना सनरायझर्स हैदराबादच्या बाजूनं वळवला. अखेरच्या षटकात सलील अरोरा १० (५) आणि स्मरण रविचंद्रन ५ (५) या जोडीनं सनरायझर्स हैदराबादचा विजय निश्चित केला.

Web Title : SRH की शानदार जीत, प्लेऑफ में जगह पक्की, GT को भी फायदा; CSK अनिश्चित।

Web Summary : SRH ने CSK को हराया, GT के साथ प्लेऑफ में जगह बनाई। किशन के 70 रनों ने SRH को 181 का लक्ष्य हासिल कराया। CSK के रुतुराज ने सिर्फ 15 रन बनाए। ब्रेविस ने 44 रन बनाए, लेकिन काफी नहीं था। अंतिम प्लेऑफ स्थान के लिए पांच टीमें प्रतिस्पर्धा कर रही हैं; CSK की संभावनाएं अन्य परिणामों पर निर्भर करती हैं।

Web Title : SRH's emphatic win secures playoff spot, benefits GT; CSK uncertain.

Web Summary : SRH defeated CSK, qualifying for playoffs alongside GT. Kishan's 70 led SRH's chase of 181. CSK's Ruturaj managed only 15. Brevis scored 44, but it wasn't enough. Five teams vie for the final playoff berth; CSK's chances depend on other results.