पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 22:23 IST2026-05-18T22:22:24+5:302026-05-18T22:23:19+5:30

PM Narendra Modi receives Norway highest honor: 'ग्रँड क्रॉस' हा 'रॉयल ​​ऑर्डर ऑफ मेरिट'चा सर्वोच्च दर्जा आहे, जो केवळ असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच प्रदान केला जातो

PM Modi receives Norway highest honor 32nd highest award in the world | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान

PM Narendra Modi receives Norway highest honor: पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी आपल्या नावावर आणखी एका महत्त्वपूर्ण कामगिरीची भर घातली आहे. युरोपीय देश नॉर्वेने पंतप्रधान मोदींना आपला सर्वोच्च सन्मान, 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' प्रदान केला आहे. पंतप्रधान मोदींना मिळालेला हा ३२वा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय सन्मान असून, तो आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा वाढता प्रभाव दर्शवतो. सोमवारी मोदी नॉर्वेमध्ये दाखल झाले, जिथे ते तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेत आणि अनेक द्विपक्षीय बैठकांमध्ये सहभागी होत आहेत. ओस्लोमध्ये आगमन झाल्यावर नॉर्वे सरकारने त्यांना हा प्रतिष्ठित सन्मान प्रदान केला. सरकारने म्हटले आहे की, 'ग्रँड क्रॉस' हा 'रॉयल ​​ऑर्डर ऑफ मेरिट'चा सर्वोच्च दर्जा आहे, जो केवळ असाधारण योगदान देणाऱ्या व्यक्तींनाच प्रदान केला जातो.

या दौऱ्याचा सर्वात महत्त्वपूर्ण आणि लक्षणीय पैलू म्हणजे ४३ वर्षांनंतर एका भारतीय पंतप्रधानांनी नॉर्वेला भेट दिली आहे. या बहुप्रतिक्षित दौऱ्यामुळे नॉर्वेमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायामध्ये उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. या सन्मानानंतर पंतप्रधान मोदींनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपला आनंद व्यक्त केला. त्यांनी लिहिले की, 'ग्रँड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' हा पुरस्कार स्वीकारताना मला सन्मानित झाल्यासारखे वाटत आहे. हा सन्मान भारताच्या जनतेला आणि भारत-नॉर्वेच्या दृढ मैत्रीला समर्पित आहे. हे जागतिक प्रगतीसाठी असलेल्या आपल्या सामायिक वचनबद्धतेचे द्योतक आहे.

पंतप्रधान मोदी सध्या पाच देशांच्या अत्यंत महत्त्वाच्या परदेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याची सुरुवात शुक्रवारी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथून झाली. तो देश सध्या इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे निर्माण झालेल्या तणावाचा सामना करत आहे. यानंतर, नेदरलँड्समार्गे पंतप्रधान मोदी सोमवारी तिसऱ्या भारत-नॉर्डिक शिखर परिषदेसाठी आणि द्विपक्षीय बैठकीसाठी नॉर्वेमध्ये दाखल झाले, जिथे त्यांचे ऐतिहासिक स्वागत करण्यात आले. नॉर्वेनंतर ते स्वीडन आणि अखेरीस इटलीला भेट देणार आहेत.

Web Title : पीएम मोदी को नॉर्वे का सर्वोच्च सम्मान, 32वां वैश्विक पुरस्कार

Web Summary : पीएम मोदी को नॉर्वे का सर्वोच्च सम्मान, 'ग्रैंड क्रॉस ऑफ द रॉयल नॉर्वेजियन ऑर्डर ऑफ मेरिट' मिला, जो उनका 32वां अंतर्राष्ट्रीय पुरस्कार है। यह 43 वर्षों के बाद भारत-नॉर्डिक शिखर सम्मेलन के लिए उनकी यात्रा के दौरान भारत के बढ़ते वैश्विक प्रभाव को दर्शाता है। उन्होंने यह पुरस्कार भारत-नॉर्वे मित्रता को समर्पित किया।

Web Title : PM Modi Honored with Norway's Highest Award, 32nd Globally

Web Summary : PM Modi received Norway's highest honor, the 'Grand Cross of the Royal Norwegian Order of Merit,' his 32nd international award. This highlights India's global influence during his visit for the India-Nordic Summit after 43 years. He dedicated the award to India-Norway friendship.