Sanju Samson Breaks MS Dhoni's All Time IPL Record : चेन्नई येथील चेपॉकच्या मैदानातील सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात संजू सॅमसन याने महेंद्रसिंह धोनीचा आयपीएलमधील सर्वकालीन विक्रम मोडीत काढला आहे. मेगा डीलच्या माध्यमातून पहिल्यांदा येलो जर्सीत खेळताना विकेट किपर बॅटरच्या रुपात संजू आता चेन्नई सुपर किंग्सकडून एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. याआधी हा विक्रम MS धोनीच्या नावे होता.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
...अन् संजूनं मोडला धोनीचा ऑलटाइम रेकॉर्ड
महेंद्रसिंह धोनी हा IPL मधील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. चेन्नई सुपर किंग्सला पाच वेळा जेतेपद मिळवून देणाऱ्या धोनीनं २०१३ च्या हंगामात विकेट किपर बॅटरच्या रुपात १६ डावात ४६१ धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात हा विक्रम मागे टाकण्यासाठी संजूला फक्त १२ धावांची गरज होती. नितीश कुमार रेड्डीनं नो बॉलसह डावाची सुरुवात केल्यामुळे संजू सॅमसनला फ्री हिटची संधी मिळाली. याचा पूरेपूर फायदा उठवत संजूनं षटकारासह आपले खाते उघडले. त्यानंतर याच षटकात दोन चौकार मारत संजूनं ६ चेंडूत १५ धावा करत धोनीचा सर्वकालीन विक्रम मोडीत काढला.
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी...
येलो जर्सीत दोन शतक झळकवणारा एकमेव फलंदाज
संजू सॅमसन याने चेन्नई सुपर किंग्सकडून अगदी धमाकेदार पदार्पण केले आहे. १३ सामन्यात त्याने जवळपास १६६ च्या सरासरीसह ४७७ धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक २ शतके झळकवण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. संजू सॅमसन याने धमाकेदार कामगिरीसह MS धोनीचा वारसा जपण्यासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. त्यात आता धोनीचा विक्रम मोडत त्याने सर्वांचे लक्षवेधून घेतले आहे.
ही गोष्ट संजूसाठी ठरली जमेची बाजू
MS धोनी हा आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचा नियमित विकेट किपर बॅटरच्या रुपात खेळताना दिसला आहे. पण तो फलंदाजीत फिनिशरच्या रुपात भूमिका बजावत होता. दुसरीकडे संजू सॅमसन विकेट किपर बॅटरसह CSK कडून सलामीवीराची भूमिका बजावत आहे. त्यामुळेच MS धोनीचा विक्रम मोडणं त्याच्यासाठी अगदी सहज शक्य झाले.