चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)

हा क्षण महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल प्रवास फेअरवेल मॅचशिवाय फोटो क्लिकसह संपल्याचे संकेत देणारा असाच आहे.

By सुशांत जाधव | Updated: May 18, 2026 22:19 IST2026-05-18T22:16:04+5:302026-05-18T22:19:34+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
IPL 2026 CSK vs SRH Special Mid Innings Moment As MS Dhoni Posed For A Photoshoot With The Chennai Super Kings Squad This Is A Farewell Photo | चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)

चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)

यंदाच्या हंगामात चेन्नईच्या चेपॉकच्या मैदानात महेंद्रसिंह धोनी अखेरचा सामना खेळेल अशी चर्चा रंगली होती. पण या सामन्यातही CSK चा संघ त्याच्याशिवाय मैदानात उतरला. ऋतुराज गायकवाडनं नाणेफेकीच्या वेळी धोनी खेळणार नसला तरी तो  आमच्या सोबत आहे, असं सांगितलं. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर भावूक क्षण पाहायला मिळाला.  

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
 

धोनी मैदानात उतरला अन्...

प्लेइंग इलेव्हन किंवा इम्पॅक्ट प्लेयरच्या रुपात CSK च्या संघाचा भाग नसणारा महेंद्रसिंह धोनी मैदानात उतरला. चेन्नई सुपर किंग्सच्या चाहत्यांनी 'धोनी धोनी...'च्या घोषणा देत त्याच्यावर प्रेम व्यक्त केले. एवढेच नाही तर  माजी कर्णधाराने संघातील सर्व खेळाडूंसोबत मिड इनिंग दरम्यान खास फोटो सेशन केले. हा क्षण महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल प्रवास फेअरवेल मॅचशिवाय फोटो क्लिकसह संपल्याचे संकेत देणारा असाच आहे.

CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी...

आंतरारष्ट्रीय क्रिकेटमधूनही फेअरवेल मॅचशिवाय केली होती निवृत्तीची घोषणा

महेंद्रसिंह धोनी हा चेन्नई सुपर किंग्सचाच नव्हे तर टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. अशा दिग्गजाने मैदानात सामना खेळून निरोप घ्यावा अशी अपेक्षा असते. पण धोनी मैदानातील निर्णयाप्रमाणेच करिअरसंदर्भातील निर्णयासह सरप्राइज देताना दिसला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनही त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन निवृत्तीची घोषणा केली होती. आता IPL मध्येही त्याने याच पॅटर्नसह फेअरवेल मॅच न खेळता थांबण्याचा निर्णय घेतल्याचे दिसते. 

IPL कारकिर्दीत सर्वाधिक सामने खेळणारा तिसरा खेळाडू

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नई सुपर किंग्ससोबत असणाऱ्या महेंद्रसिंह धोनीनं आयपीएल कारकिर्दीत २७८ सामने खेळले आहेत. यंदाच्या हंगामात तो दुखापतीमुळे एकही सामना खेळू शकला नाही. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्यापाठोपाठ सर्वाधिक IPL सामने खेळण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे. या कालावधीत त्याने IPL कारकिर्दीत त्याने २४ अर्धशतकासह ५४३९ धावा केल्या आहेत. ८४ ही त्याची सर्वोच्च धावसंख्या आहे.

Web Title : CSK की पारी के बाद धोनी मैदान में उतरे, IPL से विदाई की चर्चा!

Web Summary : धोनी के न खेलने पर भी, CSK की पारी के बाद मैदान में आने पर प्रशंसकों ने खुशी जताई। टीम के साथ फोटो सेशन से IPL से उनकी विदाई की अटकलें तेज हो गईं हैं।

Web Title : MS Dhoni's appearance after CSK innings fuels IPL farewell talks.

Web Summary : Despite not playing, MS Dhoni appeared after CSK's innings, greeted by roaring fans. A special photo session with the team suggests a possible farewell, marking the end of his IPL journey.