Anand Mahindra: पी. व्ही. सिंधूसाठी मागितली थार; आनंद महिंद्रांनी युजरला असे उत्तर दिले, की झाला गपगार...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2021 05:32 PM2021-08-02T17:32:58+5:302021-08-02T17:42:35+5:30

PV Sindhu With Mahindra Thar; Anand Mahindra share photo: कालच्या या ऐतिहासिक विजयासोबत सिंधू दोन ऑलिम्पिक पदके मिळविणारी पहिली महिला बनली आहे. तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू (PV Sindhu) हिला यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympic) अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. मात्र ही कसर तिने तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत भरून काढली आणि ऐतिहासिक कांस्य पदक (Bronze Medal) पटकावले. (Anand Mahindra reacts to Twitter user demanding Thar for PV Sindhu after Olympics Bronze win)

या ऐतिहासिक विजयासोबत सिंधू दोन ऑलिम्पिक पदके मिळविणारी पहिली महिला बनली आहे. तिच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. या दरम्यान एका ट्विटर युजरने पीव्ही सिंधूसाठी अशी काही मागणी केली, की त्यावर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रांना (Anand Mahindra) देखील रिअॅक्ट व्हावे लागले आहे.

पी. व्ही. सिंधू ने काल चीनच्या बिंग जियाओ हिचा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. या विजयावर एका युजरने म्हटले की, या सुंदर खेळासाठी तिला महिंद्रा थार (Mahindra Thar) गाडी मिळायला हवी.

ट्विटर यूजर वाडेवाले यांनी पी व्ही सिंधूसाठी ही मागणी केली. सिंधूला थार गाडी देऊन महिंद्रांनी सन्मानित करावे, असे म्हटले.

वाडेवाले यांनी यासाठी पी व्ही सिंधूला आणि महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांना टॅग केले. #TharforPVsindhu हा हॅशटॅगही वापरला आहे.

आनंद महिंद्रांची नजर जेव्हा वाडेकर यांच्या ट्विटवर पडली तेव्हा त्यांना उत्तर देण्यापासून रहावले नाही.

आनंद महिंद्रा म्हणाले, पी व्ही सिंधूच्या गॅरेजमध्ये आधीपासूनच एक महिंद्रा थार उभी आहे.

आनंद महिंद्रा यांनी 2016 मधील एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिक एका लाल रंगाच्या महिंद्रा थारमधून फेरफटका मारत आहेत.

पीव्ही सिंधू आणि साक्षी मलिकने रियो ऑलिंम्पिक 2016 मध्ये पदके मिळविली होती. यानंतर आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवरच या दोघींना त्यांची कंपनी नव्या एसयुव्ही बक्षिस देणार असल्याची घोषणा केली होती. सिंधूने तेव्हा रौप्य पदक जिंकले होते.

आणखी एका ट्विटमध्ये आनंद महिंद्रा यांनी सिंधूची प्रशंसा केली. तू आजही आमच्यासाठी गोल्डन गर्ल असल्याचे महिंद्रा म्हणाले.