पंतप्रधान मोदी सहा महिन्यात दुसऱ्यांदा केदारनाथ मंदिरात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 05:27 PM2017-10-20T17:27:49+5:302017-10-20T17:30:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी केदारनाथ मंदिराला भेट दिली. मोदींचा सहा महिन्यातील हा दुसरा केदारनाथ दौरा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच वर्षी मे महिन्यात केदारनाथ मंदिरात पूजा-अर्चना केली होती. केदारनाथ मंदिराचं द्वार उघडण्यापूर्वीच मोदी तेथे पोहोचले होते.

केदारनाथ मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी तेथील जनतेला संबोधित केलं.

मोदींनी तेथे आज अनेक विकास कामांचं उद्धाटन केलं.