"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2026 08:53 IST2026-05-20T08:53:21+5:302026-05-20T08:53:45+5:30

हॉस्पिटलपर्यंत पाठलाग करणाऱ्या आणि फोटो काढण्यासाठी आग्रह करणाऱ्या पापाराझींवर सलमान खान चिडला आहे. रात्री उशिरा अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पापाराझींना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. 

salman khan angry reaction after paparazi followed him to hospital shared post on instagram video viral | "असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा

"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा

सलमान खानला मंगळवारी(१९ मे) रात्री उशिरा मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलबाहेर स्पॉट करण्यात आलं. पण, यावेळी पापाराझींच्या वागणुकीमुळे भाईजान नाराज झाला आहे. हॉस्पिटलपर्यंत पाठलाग करणाऱ्या आणि फोटो काढण्यासाठी आग्रह करणाऱ्या पापाराझींवर सलमान खान चिडला आहे. रात्री उशिरा अभिनेत्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत पापाराझींना स्पष्ट शब्दांत तंबी दिली आहे. 

सलमानने त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. हे फोटो पोस्ट करत त्याने पापाराझींना कडक शब्दांत सुनावलं आहे. सलमान म्हणतो, "ज्या मीडियासोबत मी नेहमी उभा असतो, त्यांच्यासोबत काळजीपूर्वक वागतो. त्यांनाही दोन पैसे मिळायला हवेत याचीही काळजी घेतो". 


"जर त्याच मीडियातील लोक हॉस्पिटलबाहेर माझ्या दु:खाचा आनंद घेताना दिसले. माझ्या दु:खातून ते पैसे कमवत असतील. तर शांत बसा...एन्जॉय करू नका. फोटो महत्त्वाचा आहे की आयुष्य...", असंही त्याने पुढे म्हटलं आहे. 

सलमानने पापाराझींना इशारा दिला आहे. "फक्त पुढच्या वेळेस पुन्हा प्रयत्न करून बघा. असे मी १०० जाळेन. जर तुमचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर मी अशाप्रकारे प्रतिसाद देईन का? मी ६० वर्षांचा झालो असलो तरी अजूनही लढणं विसरलेलो नाही. हे लक्षात ठेवा... जेलमध्ये टाकाल का हाहाहा..". 


सलमानच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. रात्री ३ वाजता सलमानने अशाप्रकारे पोस्ट केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 


नेमकं काय घडलं? 

सलमान खान रात्री उशिरा हॉस्पिटलमध्ये गेला असता पापाराझींनी त्याचा पाठलाग केला. त्यानंतर हॉस्पिटलच्या आवारात त्याला फोटोसाठी मागणी केली. त्यामुळे सलमान भडकला. त्याने तिथेच पापाराझींना "तुम्ही पागल आहात का? तुमचं कोणी हॉस्पिटलमध्ये असेल तर असंच वागाल का?" असं म्हणत त्यांना तंबी दिली. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. 

Web Title : सलमान खान अस्पताल में तस्वीरों के लिए पापराज़ी पर भड़के, दी चेतावनी

Web Summary : मुंबई के हिंदुजा अस्पताल में स्पॉट किए गए सलमान खान ने पापराज़ी के व्यवहार की आलोचना की। उन्होंने व्यक्तिगत संकट का फायदा उठाने के खिलाफ चेतावनी दी, उनकी नैतिकता पर सवाल उठाया और बने रहने पर जवाबी कार्रवाई की धमकी दी। अभिनेता की देर रात की पोस्ट ने प्रशंसकों की प्रतिक्रियाओं को जन्म दिया।

Web Title : Salman Khan lashes out at paparazzi for hospital photos, issues warning.

Web Summary : Salman Khan, spotted at Hinduja Hospital, Mumbai, criticized paparazzi for their behavior. He warned against exploiting personal distress for profit, questioning their ethics and threatening retaliation if they persisted. The actor's late-night posts sparked fan reactions.