लक्ष दिव्यांनी उजळला गंगा घाट, देवदिवाळीला दिसला काशीचा असा थाट

By बाळकृष्ण परब | Published: November 30, 2020 09:15 PM2020-11-30T21:15:59+5:302020-11-30T21:34:39+5:30

Narendra Modi : देव दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. यावर्षी देवदिवाळीनिमित्त गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर लाखो दिवे पेटवण्यात आले होते.

देव दिवाळीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत. हिंदू पंचांगानुसार कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देव दिवाळी साजरी केली जाते. दरम्यान, यावर्षी देवदिवाळीनिमित्त गंगेच्या दोन्ही किनाऱ्यांवर लाखो दिवे पेटवण्यात आले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फेब्रुवारीनंतर वाराणसीत आले होते. लॉकडाऊननंतर मोदी पहिल्यांदाच वाराणसीमध्ये आले होते. या दौऱ्यात मोदींनी ५० किमी प्रवास हवाई मार्गाने तर ४० किमी प्रवास रस्तेमार्गाने केला.

कार्तिक पौर्णिमेला वाराणसीमध्ये देवदिवाळीचे आयोजन हे शेकडो वर्षांपासून होत आले आहे. या दिवशी देवतांनी शिवशंकराच्या नगरीत दिवाळी साजरी केल्याची मान्यता आहे. म्हणून हिला देव दिवाळी म्हणतात.

आज काशी श्रद्धेच्या रंगात रंगलेली दिसून आली. मोदींनी आदच्या देवदिवाळी महोत्सवाचे औपचारिक उदघाटन केले. यावेळी मोदींनी मंदिरांच्या संकेतस्थळांचेही उदघाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काशी विश्वनाथ मंदिरात जावून पूजा केली. त्यानंतर मोंदींनी कॉरिडॉर प्रोजेक्टचा आढावा घेतला. तसेच दीप दान केले.

देवदिवाळीनिमित्त वाराणसीत करण्यात आलेली दिव्यांची सुंदर आऱास.

दिव्यांच्या आराशीने उजळलेला गंगा घाट

वाराणसीमधील दीपोत्सवाचे एक विहंगम दृश्य

वाराणसीमधील गंगा घाट