हा खेळ सावल्यांचा...!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 01:32 PM2019-11-11T13:32:15+5:302019-11-11T13:42:10+5:30

सावल्यांचा खेळच वेगळा असतो, तुमचं प्रतिबिंब सावल्यांमधून दिसतं पण ते कधी कधी असं वेगळंच असतं.

पाण्यावर तरंगणाऱ्या बदकाच्या सावलीचं हे चित्र पाहून असं वाटतं की पाण्यातील मासा आहे.

गळ्यात पट्टा अडकलेला कुत्रा सावलीत पाहिल्यावर वेगळाच दिसतो अन् प्रत्यक्षात वेगळाच

नीट पाहा ही आकृती, टॉवेलच्या सावलीने चक्क पुरुष व्यक्तीच्या आकाराचे हुबेहुब चित्र रेखाटले आहे.

टॉयलेटमधील पेपरच्या सावलीची ही आकृती आहे. पेपर अशा रितीने फाटलाय की, त्यामधून चक्क पक्षाची आकृती तयारी झाली आहे.

नीट पाहा हे पोस्टर, असं वाटतंय की जाहिरातीच्या ब्रँड अम्बेसिडरच्या ओठांवर वरील लॅम्पमुळे मिशाच अवतरली आहे.

कॅमेरा हातात घेतलेल्या या सुंदर मुलीच्या सावलीत तुम्हाला कशाची आकृती दिसतेय ?

किती मस्त आहे ना हे... पुलावर लावण्यात आलेल्या तटरक्षक गजांमुळे चक्क पियानोची कलाकृती दिसून येतेय. उन्हात पडलेली ही मजेशीर सावली