नजर ना लगे! ही तरूणी ठरली जगातली 'Most Beautiful Girl', एका उत्तराने जिंकली सर्वांची मने....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2021 01:08 PM2021-01-22T13:08:23+5:302021-01-22T13:15:23+5:30

शेल्बिया किम कार्दीशियाचे ब्यूटी ब्रॅन्ड आणि कायली जेनरच्या स्कीन केअर रेंचसाठी मॉडलिंग करते. सध्या ती शेल्बिया अमेरिकेतील कोट्याधीश बिझनेसमन समर रेडस्टोनचा नातून ब्रेंडन क्रॉफला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इनमध्ये राहतात.

'सौंदर्य चेहऱ्यात नाही डोळ्यात असतं कारण ते खोटं बोलत नाहीत' असं मत आहे जगातली सर्वात सुंदर मुलगी घोषित करण्यात आलेल्या १९ वर्षीय येल शेल्बियाचं. इस्त्राइलची शेल्बियाला जगातील सर्वात सुंदर मुलगी घोषित करण्यात आलं तेव्हा ती इस्त्राइलमधील अनिवार्य आर्मी ट्रेनिंगमध्ये व्यस्त होती.

जगातील प्रसिद्ध टीसी कॅलेंडरकडून घोषित करण्यात आलेल्या जगातील सर्वात सुंदर १०० मुलींमध्ये शेल्बिया पहिल्या क्रमांकावर आहे. ही स्पर्धा २०१७ मध्ये जास्त चर्चेत आली होती कारण त्यावेळी केवळ एक ६ वर्षांच्या मुलीला जगातील सर्वात सुंदर मुलीचा किताब मिळाला होता.

आता हा किताब जिंकण्याआधी शेल्बियाने एक उत्तर देऊन जजचं मन जिंकलं होतं. ती म्हणाली होती की, जगातली प्रत्येक स्त्री सुंदर आहे फक्त फक्त बघण्याचा दृष्टीकोन हवा.

इस्त्राइलची मॉडल आणि अभिनेत्री शेल्बिया गेल्या तीन वर्षांपासून या स्पर्धेत भाग घेत होती. या स्पर्धेत ४० पेक्षा जास्त देशातील सुंदरी भाग घेतात. शेल्बिया म्हणाली की, जेव्हा मला ही बातमी मिळाली तेव्हा मी इस्त्राइल एअरफोर्सचं ट्रेनिंग घेत होते. माझा विश्वासच बसला नाही की, मी हा किताब मिळवू शकते. कारण चेहऱ्यावरून मला आधी लोक टोमणे मारायचे. माझ्या लूकबाबत वाईट कमेंट करत होते.

दरम्यान २०१७ मध्ये Thylane Blondeau नावाची सहा वर्षांची मुलगी या स्पर्धेमुळे फेमस झाली होती. सोबतच ही स्पर्धाही जगभरात फेमस झाली होती.

शेल्बिया म्हणाली की, ती लवकरच मॉडलिंगसाठी दुसऱ्या देशात जाणं सुरू करेल. कोरोना गेला की, ती पुन्हा काम सुरू करेल. शेल्बिया म्हणाली की, २०१७ मध्ये तिला या स्पर्धेत १५ वं स्थान मिळालं होतं. २०१८ मध्ये तिसरं आणि २०१९ मध्ये दुसरं.

शेल्बिया किम कार्दीशियाचे ब्यूटी ब्रॅन्ड आणि कायली जेनरच्या स्कीन केअर रेंचसाठी मॉडलिंग करते. सध्या ती शेल्बिया अमेरिकेतील कोट्याधीश बिझनेसमन समर रेडस्टोनचा नातून ब्रेंडन क्रॉफला डेट करत आहे. दोघेही लिव्ह इनमध्ये राहतात.