मुक्या प्राण्यांनाही भावना असतात! असा व्यक्त करतात शोक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 02:40 PM2020-01-31T14:40:46+5:302020-01-31T15:00:38+5:30

आपल्या निकटवर्तींयांना गमावल्याचे दु:ख केवळ माणसांनाचा नाही तर मुक्या प्राण्यांनाही होते. कधीकधी या मुक्या प्राण्यांच्या शोक हृदय हेलावणारा असतो.

म्युंस्टर येथील प्राणीसंग्रहालयात असलेल्या ह्या गोरिल्ला मादीला तिच्या मुलाचा मृत्यू झाला आहे हे कळले नाही. बरेच दिवस ती त्याचे शव आपल्यासोबत घेऊन फिरत होती. या काळात तिने प्राणिसंग्रहालयातील कर्मचाऱ्यांनासुद्धा आपल्याजवळ येऊ दिले नाही.

व्हेल, डॉल्फीनसारखे समुद्री प्राणीसुद्धा आपल्या सहकाऱ्याचा मृतदेह अनेक दिवस आपल्यासोबत ठेवतात. तसेच तो मृतदेह बुडू नये म्हणून त्याला आपल्या पाठिवर घेऊन फिरतात. मात्र अखेरीस असा मृतदेह पाण्याच्या तळाला जातो.

हत्तींची गणना उत्तम बुद्धिमत्ता असलेल्या प्राण्यांमध्ये होते. हत्ती आपल्या कळपातील कुणाचा मृत्यू झाला तर बरेच दिवस त्याचा मृतदेह आपल्यासोबत ठेवतात. तसेच त्याल उठवण्याचा प्रयत्न करतात. तरुण हत्तीचा मृत्यू झाल्यास दुसऱ्या कळपातील हत्तीसुद्धा शोक करण्यासाठी पोहोचतात.

आपल्या निकटवर्तीचा मृत्यू झाल्यास माकडेसुद्धा मोठ्या प्रमाणात शोक करतात. तसेच मृतदेहाची शवयात्रा काढतात.

कळपातील कावळ्याचा मृत्यू झाल्यास कावळे त्या मृत कावळ्याभोवती जमा होतात. तसेच काही काळ खाणे पिणे सोडतात.

निकटवर्तीयाचा मृत्यू झाल्यास मासेसुद्धा शांत होतात. संग्रहालयातील एखाद्या माशाचा मृत्यू झाल्यास इतर माशांमध्ये तणाव वाढतो. त्यातील काही जणांच्या वर्तनात फरक पडतो.

मांजर आणि अस्वल हे काही नैसर्गिक मित्र नाहीत. मात्र बर्लिनमधील प्राणी संग्रहालयात मांजर आणि अस्वलाची मैत्री झाली होती. जेव्हा या अस्वलाचा मृत्यू झाला त्यानंतर मांजर बरेच दिवस रडत होते.

पाळीव कुत्र्याच्या मृत्यूचे जेवढे दु:ख त्यांच्या मालकांना होते. त्यापेक्षा अधिक दु:ख या कुत्र्यांना होत असते. अनेक कुत्रे आपल्या मालकाची अखेरपर्यंत वाट पाहतात.