७ दिवस अन् १ रस्ता, भारताचं सोनं लुटण्याची चीनने केली तयारी; लडाखमध्ये दडलाय मोठा खजिना!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2020 09:52 AM2020-06-01T09:52:10+5:302020-06-01T09:55:14+5:30

कोरोना महामारीसोबत जगातील अन्य देश लढत असताना दुसरीकडे लडाख सीमेजवळ चीन रोज नवनवीन शक्कल लढवत आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासून भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये या परिसरात ताणतणाव वाढला आहे.

चीनने वास्तविक नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) जवळपास ७ दिवसात एक नवीन रस्ता तयार केला आहे, जो अशा दुर्गम भागात सहज पोहचणं सोप्प जाईल ज्याठिकाणी खनिज संसाधने मोठ्या प्रमाणात आहेत.

या मजबूत रस्त्यावरुन अवजड वाहने सहजपणे जाऊ शकतात. या रस्त्यामुळे चीन एलएसीच्या आणि भारताच्या गोगरा पोस्टच्या अगदी जवळ पोहचला आहे. याठिकाणी सोन्यासारख्या मौल्यवान खनिजांचा साठा आहे हे सॅटेलाइट फोटोंमधून दिसते.

चीनने हा रस्ता अवघ्या ३ आठवड्यात बांधला. हा रस्ता ४ कि.मी. लांबीचा असून या माध्यमातून चीन एलएसी जवळ गेल्या काही वर्षांत बांधलेल्या रस्त्यांशी कनेक्ट होऊ शकेल.

लडाखच्या सीमेजवळ चीनच्या या योजना ठिक दिसत नाही, या रस्त्यापासून १० किलोमीटर अंतरावर चीनने शस्त्रे जमा केली असल्याचे सॅटेलाइट छायाचित्रांमध्ये दिसून आले आहे. सूत्रांनी सांगितले की, याठिकाणी छोटा रस्ता बनवण्यात आला आहे.

गेल्या काही आठवड्यांत चीनने दोन पूल व पक्के रस्ते तयार केले आहेत. याचा उपयोग वाहने आणि जवानांच्या हालचालींसाठी केला जाऊ शकतो. भारतीय सीमेच्या आत पर्वतांच्या रांगामध्ये मौल्यवान धातूंचा खजिना आहे.

भारताने गोगरा पोस्ट येथे सतर्कता आणि सुरक्षा वाढवली आहे. परंतु या खनिज समृद्ध क्षेत्रात पोहोचण्यासाठी भारताकडे पायाभूत सुविधांचा अभाव आहे.

उपग्रह छायाचित्रांचे तज्ञ कर्नल विनायक भट्ट (निवृत्त) यांचे मत आहे की, या पर्वतांमध्ये सोने असू शकते. तसेच सोन्याखेरीज आणखी मौल्यवान धातू असू शकतात असा दावा त्यांनी केला आहे.

चीनच्या योजना पाहिल्या तर भारताच्या या प्रदेशावर चीनला कब्जा करायचा आहे. दरम्यान, दोन्ही देशातील तणाव कमी करण्यासाठी चर्चा सुरु आहेत, पण समाधान मिळालं नाही. गलावन घाटी आणि पैगोंग शो झील जवळ चीनचे हजारौ सैनिक तैनात आहेत.

दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी भारताकडे आता सक्षम नेतृत्व आहे, कोणत्याही परिस्थितीत भारताच्या स्वाभिमानाला धक्का पोहचणार नाही असा सूचक इशाराही चीनला दिला आहे.