सोशल मीडियाच्या अतिवापराचे दुष्परिणाम तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 03:58 PM2019-07-25T15:58:59+5:302019-07-25T16:21:37+5:30

अत्याधुनिक स्मार्टफोन्स आणि इंटरनेटच्या विस्तारामुळे गेल्या काही वर्षात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेकांचा दिवसातील बहुतांश वेळ फेसबूक, व्हॉट्स अॅपवरच जातो. कधीकधी इच्छा असूनही सोशल मीडियापासून दूर राहणे शक्य होत नाही. सोशल मीडियाने मानवी जीवनात मोठी क्रांती आणली असली तरी त्याचे काही तोटे सुद्धा आहेत. आज आपण जाणून घेऊयात सोशल मीडियामुळे माणसाच्या मेंदूवर होणाऱ्या परिणामांविषयी.

आज जगातील अर्ध्याहून अधिक लोकांपर्यंत इंटरनेट पोहोचले आहे. इंटरनेटचा वापर करणाऱ्या पाच ते दहा टक्के युझर्सनी सोशल मीडियावर घालवण्यात येणारा वेळ कमी करणे आपल्याला शक्य होत नसल्याचे मान्य केले आहे. अशा लोकांच्या डोक्याचे स्कॅन केले असता त्यांच्या मेंदूतील त्या भागात गडबड झाल्याचे आढळून आले जिथे ड्रग्सचे सेवन गेल्यामुळे गडबड होते.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे भावना, एकाग्रत आणि निर्णयांना नियंत्रित करणाऱ्या मेंदूच्या भागावर विपरित परिणाम होतो. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे वापरकर्त्याला एक खोटा आनंद मिळते.

सोशल मीडियावर वाढत्या वापरामुळे एकाच वेळी अनेक गोष्टी करण्याची सवय अनेकांना लागली आहे. त्यामुळे मेंदू लक्ष भटकवणाऱ्या गोष्टींना ओळखण्याची क्षमता मेंदू गमावून बसतो.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे मेंदूवर परिणाम होतो. त्यामुळे आपला फोन वाजलाय का, व्हायब्रेट झालाय का असा भास वारंवार होऊ लागतो. याला शास्त्रीय भाषेत फैंटम वाइब्रेशन सिंड्रोम म्हणतात.

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे एककेंद्री वृत्त वाढते. तसेच अशा व्यक्ती आपल्याच विश्वात गुंतून जातात.

सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांमध्ये सोशल मीडियावरील लाइक, कमेंट्सवरून आनंद मिळवण्याचे प्रमाण वाढते.

मात्र सोशल मीडियाचा एक फायदा म्हणजे सोशल मीडियावर पहिल्यांदाच भेटलेली जोडपी डेटिंगमध्ये अधिक यशस्वी होतात.