मोठा दिलासा! Corona Vaccine ची कमाल, अनेक आजारांवर ठरतेय 'संजीवनी', लोकांचे 'हे' त्रास झाले दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 03:53 PM2021-03-02T15:53:53+5:302021-03-02T16:16:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल दहा कोटींचा टप्पा पार केला असून लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. अनेक देशांमध्ये पुन्हा एकदा लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी खबरदारीचे उपाय करण्यात येत आहेत. लसीकरण मोहीमेला सुरुवात झाली असून हजारो नागरिकांनी कोरोनाची लस घेतली आहे.

संशोधनातून कोरोना लसीबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती मिळत आहे. कोरोना लसीने कमाल केली असून ते अनेक आजारांवर संजीवनी ठरत असल्याचा रिसर्चमधून खुलासा करण्यात आला आहे.

कोरोनाची लस ही फक्त कोरोना व्हायरसपासूनच बचाव करत नाही तर इतर आजारांवरही फायदेशीर ठरत असल्याचं दिसून आलं आहे. जगभरात ज्या लोकांनी कोरोना लस घेतली त्यांचे इतर आजारही दूर झाले आहेत.

रिपोर्टनुसार, कोरोना लस घेणाऱ्या व्यक्तींचे इतर आजारही बरे झाले आहेत. आरोग्यासंबंधित समस्यांना नियंत्रित करण्यातही कोरोना लस प्रभावी ठरत असल्याचं दिसून आता नव्या रिसर्चमधून दिसून आलं आहे.

इंग्लंडमधील 72 वर्षांच्या जोआन यांच्या गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आणि त्यानंतर त्यांना इन्फेक्शन झालं. त्या नीट चालू देखील शकत नव्हत्या. त्यांना खूप त्रास सहन करावा लागत होता. मात्र त्यांनी कोरोनाची लस घेतील आणि दुसऱ्याच दिवशी त्यांच्या वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या.

जोआन यांच्याप्रमाणेच दुर्मिळ आजार असलेल्या आणखी एका व्यक्तीनेही कोरोना लस घेतल्यानंतर आपण ठिक झाले असून उत्तम असल्याचं सांगितलं आहे.

एका व्यक्तीला खाजेची समस्या होती. त्याच्या हातापायाला खाज यायची. लस घेतल्यानंतर काही तासांतच त्याच्या हातापायांना खाजेमुळे झालेले व्रण गायब झाले.

एका महिलेला गेल्या 25 वर्षांपासून चक्कर यायची. कोरोना लस घेतल्यानंतर चार दिवसांनी तिला चक्कर येणं बंद झालं आहे.

एका महिलेनं सांगितलं की तिच्या नवऱ्याला स्लीप डिसॉर्डर होता. ज्यामुळे त्यांना नीट झोप लागायची नाही. पण लस घेतल्यानंतर 15 वर्षांनी ते पहिल्यांदाच शांत झोपले.

फक्त कोरोना लसच नाही तर याआधीदेखील काही लशींनी अशीच कमाल केली होती. काही ठिकाणी कोरोना लसीचे साईड इफेक्ट समोर येत असताना या माहितीमुळे मोठा दिलासा मिळाला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्य़ासाठी युद्धपातळीवर संशोधन सुरू आहे. तसेच अनेक ठिकाणी चाचण्यांना देखील यश आलं आहे. याच दरम्यान कोरोना अँटीबॉडी संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आता समोर आली आहे. WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनेने त्याबाबत माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार जगातील एकूण लोकसंख्येच्या 10 टक्क्यांपेक्षाही कमी लोकसंख्येत कोरोना अँटीबॉडी विकसित झाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली.

सौम्या स्वामीनाथन यांनी अत्यंत उच्च घनता असलेल्या शहरी वस्तींमध्येही लोकसंख्येच्या 50 ते 60 टक्के लोकांना व्हायरसची लागण झाली आणि त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज विकसित झाली आहे असं म्हटलं आहे. तसेच हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी लसीकरण हा एकमेव मार्ग असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे.

देशात सातत्याने कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. लोकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास यंदाची होळी ही "सुपर स्प्रेडर ऑफ कोरोना' ठरू शकेल असा इशारा आरोग्य तज्ञांनी दिला आहे. कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ शकते.

महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, तेलंगणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये कोरोनाच्या नवीन रुग्णांची संख्या वाढत आहे. याच दरम्यान तज्ज्ञांनी हा इशारा दिला आहे.

कोरोनाच्या बाबतीत आता जर निष्काळजीपणा दाखवला तर येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत खूप मोठी वाढ होऊ शकते. यामुळे अशा परिस्थितीत आपण सार्वजनिक कार्यांपासून दूर राहिलं पाहिजे. विशेषत: होळीच्या वेळी. कारण या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही.