मस्तच! मुंबईचा वडापाव देणार बर्गरला टक्कर, सर्वोत्तम बर्गरच्या यादीत समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2020 05:43 PM2020-02-18T17:43:36+5:302020-02-18T18:18:35+5:30

मुंबईच्या बीझी लाईफस्टाईलमध्ये वडापाव हा पदार्थ सगळयात जास्त खाल्ला जातो. पोटाला आधार देण्यासाठी कमीतकमी पैशात वडापाव अनेकांची भूक भागवतो. मुंबई आणि वडापाव हे वेगळंच समीकरण आहे. खरं तर वडापाव ही मुंबईची शान आहे.

जगातील सगळयात खाल्ल्या जात असलेल्या फास्टफुडमध्ये वडापावचा समावेश आहे.

शेफ स्टार्सच्या लिस्टमध्ये याचा समावेश करण्यात आला होता. यात वडापावसह जगभरातील वेगवेगळया डीशेजचा समावेश करण्यात आला होता.

जगभरातील मासाहारी बर्गरच्या तुलनेत मुंबईच्या वडापावला पसंती मिळाली आहे. मुंबईच्या स्वाती स्नॅक्स या दुकानात मिळत असलेल्या या वडापावचे श्रेय देण्यात आले आहे. वडापावसोबत असणारी चटणी या वडापावची चव दुपटीने वाढवते.

मुंबईच्या वडापावला शेफ रविंद्र भोगल आणि प्रतीक सिंधू यांनी जगातील सगळयात चांगल्या बर्गरसाठी निवडलं आहे. अमेरिका, शिकागो, लंडन, डेनमार्क, चीन, यांसारख्या देशातील वेगवेगळ्या डिशेसचा समावेश होता.

भारतासह चीनच्या वेगवेगळे पदार्थ यात समाविष्ट होते.

विविध देशांच्या शाकाहारी आणि मासांहारी वेगवेगळ्या डिशेजचा समावेश होता. पण त्यांना टक्कर देत वडापाव पहिल्या क्रमांकाच्या फास्ट फुडमध्ये समाविष्ट झाला आहे.

टॅग्स :अन्नfood