पोलिसही हादरले! प्रेयसीसोबत लग्न करायचे होते, गँग बनवून प्रियकर बनला लुटारू

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2021 01:38 PM2021-02-24T13:38:18+5:302021-02-24T13:52:39+5:30

Crime News: युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते. हे वाचायला किंवा सिनेमात चांगले वाटते. प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने चुकीचा रस्ता निवडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

युद्धात आणि प्रेमात सारे काही माफ असते. हे वाचायला किंवा सिनेमात चांगले वाटते. उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये पोलिसांनी एका टोळक्याला पकडले आहे.

प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पैशांची गरज होती म्हणून मुख्य आरोपी असलेल्या प्रियकराने चुकीचा रस्ता निवडला आणि पोलिसांच्या जाळ्यात अडकला.

तेथील एका मेडिकल दुकानात चोरी झाल्यामुळे पोलिसांनी केलेल्या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात आतापर्यंत 3 जणांना पकडण्यात आले आहे.

मुख्य आरोपी त्याच्या प्रेयसीसोबत पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. 10 फेब्रुवारीला त्यांनी हे मेडिकल फोडले होते. एका पुलावर चार जणांनी मेडिकलच्या मालकाला घेरले.

दांड्याने त्याला मारहाण करण्यात आली, त्याच्याकडून बाईक, मोबाईल आणि रुपये लुटण्यात आले. दुकानदार बेशुद्ध झाला. शुद्धीवर आल्यानंतर त्याने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली.

या प्रकरणात पोलिसांना सुरुवातीला मोठे यश मिळाले. या टोळीच्या तीन जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर पोलिसांना एक लव्ह स्टोरी असल्याचे समजले.

मिर्झापूरला राहणारा दिनेश हा त्यांचा मुखिया होता. त्याने प्रेयसीबरोबर पळून जाऊन लग्न करण्याचा प्लॅन बनविला होता. यासाठी त्याला पैशांची गरज होती. त्याला झटपट पैसे हवे होते.

यासाठी त्याने गुन्हेगारीचा रस्ता पकडला. यानंतर त्याने लुटलेली बाईक विकून ते पैसे घेऊन पसार झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, जे आरोपी पकडण्यात आले आहेत त्यांची आधी कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाहीय. महत्वाचे म्हणजे जेव्हा जेव्हा पोलीस तपासासाठी त्या ठिकाणी जात होते, तेव्हा हे तिघे आरोपी तिथे पोहोचत होते.

आणि पोलिसांच्या हालचालींवर लक्ष ठेवायचे. सारखे सारखे असेच घडल्याने पोलिसांना त्यांच्यावर संशय आला आणि त्यांना ताब्यात घेतले.