Jahangirpuri Violence: भंगाराचा व्यवसाय, अय्याश जीवन जगायचा दिल्लीतील जहांगीरपुरी दंगलीतील मुख्य आरोपी, असे उडवायचा पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2022 04:38 PM2022-04-19T16:38:06+5:302022-04-19T16:57:52+5:30

Crime News, Jahangirpuri Violence: दिल्लीतील जहांगीरपुरी दंग्याचा तपास सुरू आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून मोहम्मद अंसारचं नाव पुढे आलं आहे. अंसारचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ते खूप अय्याश जीवन जगताना दिसत आहेत.

दिल्लीतील जहांगीरपुरी दंग्याचा तपास सुरू आहे. यामध्ये मुख्य आरोपी म्हणून मोहम्मद अंसारचं नाव पुढे आलं आहे. अंसारचे काही फोटो समोर आले आहेत. ज्यामध्ये ते खूप अय्याश जीवन जगताना दिसत आहेत.

जहांगीरपुरी दंग्याच्या आतापर्यंतच्या हिशेबाने मुख्य आरोपी अंसारचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोमध्ये तो कुठल्यातरी डॉनप्रमाणे हातात बंदूक घेतलेला दिसत आहे.

अंसार खूप आलिशान जीवन जगतो, याचा अंदाज त्याचे फोटो पाहिल्यावर येतो. त्याला दागिने घालण्याची मोठी हौस आहे. त्याच्याकडे सोन्याचया महागड्या चेनसह खूप अंगठ्या आणि इतर दागिने आहेत.

तसेच अंसारला रोख नोटा सोबत बाळगण्याची खूप मोठी हौस आहे. त्यामुळे हातात नोटांची बंडले घेऊन फोटो तो काढत असतो.

अंसार हा दाखवण्यासाठी भंगाराचा व्यवसाय करतो. मात्र त्यावर सट्ट्यासारख्या अवैध धंदे चालवल्यामुळे त्याच्याविरोधात चार गुन्हे दाखल आहेत. तसेच त्याच्या उत्पन्नाचा सट्टेबाजी हा मुख्य मार्ग असावा, असा अंदाज आहे.

मोहम्मद अंसारी हा जहांगीरपुरीमधील झोपडीत जन्मला होता. त्याच्या वडिलांचं नाव मोहम्मद अलाउद्दीन आहे. अंसार केवळ चौथी शिकलेला आहे. तसेच पेशाने भंगाराचा व्यवसाय करतो.