खळबळजनक! ब्रेकअपनंतर तरूणीने बॉयफ्रेन्डला घरी बोलवलं, मग होणाऱ्या पतीच्या मदतीने केली त्याची हत्या..

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2021 02:51 PM2021-02-16T14:51:09+5:302021-02-16T15:13:53+5:30

Crime News : पोलिसांनुसार, नितीन सतत तरूणीला त्रास देत होता. अशात तिने होणाऱ्या पतीसोबत एक्स-बॉयफ्रेन्डचा काटा काढण्याचा प्लॅन(Murder) केला.

उत्तर प्रदेशच्या गाजियाबादमधून (Ghaziabad) एक खळबळजनक घटना समोर आली आहे. इथे एका तरूणीने तिच्या २६ वर्षीय एक्स-बॉयफ्रेन्डला(Ex Boyfriend) पार्टीसाठी घरी बोलवलं. मग होणाऱ्या पतीसोबत मिळून कथितपणे त्याची हत्या (Murder) केली.

पोलिसांनी सांगितले की, या घटनेनंतर तरूणी आणि तिचा होणारा पती दोघेही फरार आहेत. पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत.

ही घटना गाजियाबादच्या वैशाली सेक्टर-४ मध्ये घडली आहे. मृत व्यक्तीचं नाव नितिन चौधरी(२६) असून तो बी.कॉमचा विद्यार्थी होता.

पोलिसांनी सांगितले की, शेजाऱ्यांनी फ्लॅटमधून दुर्गंधी येण्याची तक्रार केली होती. ज्यानंतर पोलिसांनी कारवाई करत मृतदेह ताब्यात घेतला.

घटनेपासून तरूणी तिच्या होणाऱ्या पतीसोबत फरार झाली आहे. सध्या पोलिसांनी याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. या व्यक्तीकडे फ्लॅटच्या मालकाने घर भाड्याने देण्यासाठी चावी दिली होती.

फ्लॅटच्या मालकाने चौकशी दरम्यान सांगितले की, त्याने त्याच्या मित्राकडे फ्लॅटची चावी दिली होती. जेणेकरून फ्लॅट भाड्याने देता येईल.

पोलिसांनी सांगितले की, नितिन चौधरी आणि तरूणीचं जवळपास चार वर्षे रिलेशन होतं. पण दोन महिन्यांपूर्वी दोघांचं ब्रेकअप झालं होतं. यादरम्यान तरूणीचं लग्न सनी नावाच्या तरूणासोबत ठरलं. दोघांचा साखरपुडाही झाला.

पण नितीन ब्रेकअप मान्य करू शकत नव्हता. तो तरूणीवर लग्नासाठी दबाव टाकत होता आणि तिला त्रास देत होता.

पोलिसांनुसार, नितीन सतत तरूणीला त्रास देत होता. अशात तिने होणाऱ्या पतीसोबत एक्स-बॉयफ्रेन्डचा काटा काढण्याचा प्लॅन केला.

तरूणीने खोटं कारण सांगत देत नितीनला पार्टीसाठी घरी बोलवलं. तिथे तिचा होणारा पती सनीही उपस्थित होता. पार्टीत तिघांनीही दारू प्यायली.

नंतर तरूणीने होणाऱ्या पतीसोबत मिळून एक्स बॉयफ्रेन्ड नितीनची हत्या केली. त्यानंतर दोघेही तेथून फरार झाले. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.