मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 06:29 IST2026-05-19T06:28:45+5:302026-05-19T06:29:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली/लातूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटरचे (आरसीसी) संस्थापक शिवराज ...

Motegaonkar wrote papers for his son? Nine days in custody, CBI claims; Questions and answers provided through handwritten notes | मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे

मोटेगावकरने स्वतःच्या मुलासाठीच फाेडला पेपर? नऊ दिवसांची कोठडी, सीबीआयचा दावा; हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून पुरवले प्रश्न व उत्तरे

लोकमत न्यूज नेटवर्क 
नवी दिल्ली/लातूर : देशभरात खळबळ उडवणाऱ्या नीट-यूजी पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील रेणुकाई करिअर सेंटरचे (आरसीसी) संस्थापक शिवराज रघुनाथ मोटेगावकर याला दिल्लीतील विशेष सीबीआय न्यायालयाने सोमवारी नऊ दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली. पेपरफुटी आणि प्रश्नपत्रिका पुरवठा करण्यात मोटेगावकर याने महत्त्वाची भूमिका बजावल्याचा दावा तपास यंत्रणेने केला आहे.

विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. तपासासाठी अधिक वेळ आवश्यक असल्याचे सांगत सीबीआयने मोटेगावकर याच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी केली होती. यावर न्यायालयाने त्याला नऊ दिवसांच्या सीबीआय कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला. सीबीआयने रविवारी लातूरमध्ये मोटेगावंकर यांना अटक केली होती.

मोटेगावकरच्या मोबाइलमध्ये ३ मे रोजी झालेल्या नीट परीक्षेची कथित लीक झालेली प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा सीबीआयने केला आहे. 

दहा दिवस आधीच प्रश्नपत्रिका माेटेगावकरकडे? 
तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, २३ एप्रिल रोजीच म्हणजे परीक्षा होण्याच्या जवळपास दहा दिवस आधी मोटेगावकर याच्याकडे प्रश्नपत्रिका आणि उत्तरे आली होती. त्यानंतर त्याने हस्तलिखित नोट्सच्या माध्यमातून अनेकांना प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पुरवली. परीक्षा संपल्यानंतर या नोट्स नष्ट करण्यात आल्याचाही संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

मोटेगावकरने मुलासाठीच फाेडला पेपर? 
स्वतःच्या मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी अधिक गुण मिळावेत, यासाठीच मोटेगावकर यांनी पेपरफूट केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, यंदा मोटेगावकर यांचा मुलगाही बारावीमध्ये शिकत होता आणि त्याने नीट परीक्षा दिली होती. त्यामुळे मुलाला वैद्यकीय प्रवेशासाठी जास्त गुण मिळावेत, या हेतूने पेपर फाेडण्यात आला का, या दृष्टीने सीबीआय तपास करत आहे.
सीबीआयने दावा केला की, मोटेगावकर हा प्रश्नपत्रिका फोडण्यात आणि पसरवण्यात सहभागी असलेल्या संघटित टोळीचा सक्रिय सदस्य होता. आपल्या कोचिंग सेंटरच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. 
 

Web Title : नीट पेपर लीक: कोचिंग सेंटर मालिक गिरफ्तार, सीबीआई को बेटे के फायदे का शक।

Web Summary : लातूर कोचिंग सेंटर के संस्थापक मोटेगाँवकर नीट पेपर लीक में गिरफ्तार। सीबीआई को शक है कि उसने अपने बेटे को फायदा पहुंचाने के लिए पेपर लीक किया, परीक्षा से पहले हस्तलिखित नोट्स दिए। वह अब सीबीआई हिरासत में है।

Web Title : NEET Paper Leak: Coaching Center Owner Arrested, CBI Suspects Son's Benefit.

Web Summary : Latur coaching center founder Motegaonkar arrested in NEET paper leak. CBI suspects he leaked the paper to benefit his son, providing handwritten notes with answers before the exam. He is now in CBI custody.