सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2026 06:36 IST2026-05-19T06:35:50+5:302026-05-19T06:36:07+5:30

अनेक वर्षांत ‘नीट’ निकालातील उच्चांकात लातूर व नांदेड चर्चेत आहे. २०२४, २०२६ च्या पेपरफुटीत लातूर, नांदेड चर्चेत राहिले.  पेपर फोडणाऱ्यांनी लातूर, नांदेडमधील विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा उचलत सावज टिपल्याचे दिसते.

CBI team stationed in Latur city; Tight security deployed in coaching classes area | सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  

सीबीआय पथक लातूर शहरात ठाण मांडून; कोचिंग क्लासेस परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात  

लोकमत न्यूज नेटवर्क 
लातूर : प्रा. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केल्याची बातमी सोमवारी लातुरात धडकली. त्यानंतर आरसीसी (रेणुकाई केमिस्ट्री क्लासेस) परिसरात पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून, तिसऱ्यांदा शहरात दाखल झालेले पथक ठाण मांडून आहे. 

अनेक वर्षांत ‘नीट’ निकालातील उच्चांकात लातूर व नांदेड चर्चेत आहे. २०२४, २०२६ च्या पेपरफुटीत लातूर, नांदेड चर्चेत राहिले.  पेपर फोडणाऱ्यांनी लातूर, नांदेडमधील विद्यार्थ्यांच्या गर्दीचा फायदा उचलत सावज टिपल्याचे दिसते.

प्रा. पी.व्ही. कुलकर्णीशी कनेक्शन; विद्यार्थिनी, पालकांची चौकशी 
केमिस्ट्रीचे पेपर सेटर प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याच्या जबाबातून मोटेगावकर याचा संदर्भ समोर आल्याने अटक करण्यात आली असून, ज्यांना पेपर मिळाला त्यांचीही चौकशी सुरू आहे. लातूर येथील एका विद्यार्थिनीस व पालकास पुणे येथे चौकशीसाठी बोलाविण्यात आल्याचे वृत्त आहे.

कुलकर्णीकडून मिळाले केमिस्ट्रीचे १३२ प्रश्न  
‘नीट’चा ३ मे रोजी झालेला पेपर २३ एप्रिल रोजीच मिळाला. प्रा. पी.व्ही. कुलकर्णीकडून केमिस्ट्रीचे १३२ प्रश्न मोटेगावकरकडे आले. त्याने ते प्रश्न पीडीएफ स्वरूपात समोर दिले. तर बहुतांश जणांकडे १ मे रोजी टेलिग्रामद्वारे प्रश्न पोहोचले होते. नाशिक, पुणे, लातूर असा उलगडा 
होत गेला. 

Web Title : लातूर में नीट पेपर लीक की सीबीआई जांच; सुरक्षा कड़ी

Web Summary : लातूर में नीट पेपर लीक मामले में सीबीआई ने प्रोफेसर को गिरफ्तार किया। कोचिंग सेंटरों के आसपास सुरक्षा बढ़ाई गई। परीक्षा से पहले लीक हुए प्रश्नों के बाद प्रोफेसर के कनेक्शन और छात्र की भागीदारी पर ध्यान केंद्रित किया गया। लातूर, पुणे और नाशिक में जांच जारी है।

Web Title : CBI Investigates NEET Paper Leak in Latur; Security Tightened

Web Summary : CBI arrests professor in Latur NEET paper leak case. Security beefed up around coaching centers. Focus on professor's connections and student involvement after leaked questions surfaced before the exam. Investigations continue in Latur, Pune, and Nashik.