एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर

By राजेश निस्ताने | Updated: May 19, 2026 06:32 IST2026-05-19T06:32:15+5:302026-05-19T06:32:52+5:30

NEET paper leak: ज्यांना ज्यांना पेपर मिळाले त्या विद्यार्थ्यांसह पालकांचीही चौकशी होणार

NEET paper leak: Paper purchase from over 1,000 students; CBI suspects: 'Alok' in Nagpur now on radar | एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर

एक हजारावर विद्यार्थ्यांकडून पेपर खरेदी; ‘सीबीआय’ला संशय : नागपूरमधील ‘आलोक’ आता रडारवर

- राजेश निस्ताने
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : नीट पेपरफूट घोटाळ्यात किमान एक हजार विद्यार्थ्यांनी हा पेपर खरेदी केल्याचा दाट संशय सीबीआयला आहे. नांदेड कनेक्शनमध्ये असलेला नागपूर येथील ‘आलोक’ सीबीआयच्या रडारवर आहे. 

नीट पेपरफूट प्रकरणात पुण्यातून तिघांना अटक झाली. रविवारी रात्री १ वाजता लातूरच्या आरसीसी क्लासेसचा प्रमुख प्रा. डॉ. शिवराज मोटेगावकर याला सीबीआयने अटक केली. सीबीआयचे मुंबईतील महानिरीक्षक हर्षवर्धन यांच्या मार्गदर्शनात पुणे सीबीआयचे तपासप्रमुख विनोद चौधरी (आयआरएस) यांनी नांदेडात नुकतीच धडक दिली. हॉटेल व्यावसायिक कदम परिवाराची चौकशी केली गेली.  

नांदेडच्या विद्युतनगरस्थित अश्विनी  कदम या महिलेने आपल्या मुलीसाठी पाच लाखांत पेपर खरेदी केला. त्यासाठी २५ हजार रुपये ऑनलाइन पेमेंट केले गेले. आलोकने त्यांना १५ दिवस पुण्यात थांबवून तेथेच 
पेपर दिला. 

क्लासेसचे संचालक फरार 
नांदेडमध्ये अनेक कोचिंग क्लासेसने सत्र संपल्याच्या नावाखाली कार्यालये बंद केली आहेत. त्यामुळे त्यांच्या भोवतीही संशयाचे वलय निर्माण झाले आहे.  कोचिंग क्लासेसचे काही संचालक फरार झाले आहेत.

प्रा. मनीषा मांढरे निलंबित
पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या पुण्यातील मॉडर्न कॉलेजच्या जीवशास्त्राच्या प्राध्यापिका मनीषा मांढरे यांना महाविद्यालय प्रशासनाने निलंबित केले आहे. 
महाविद्यालयाने सोमवारी याबाबतचे निवेदन प्रसिद्ध केले. १६ मेपासून हे निलंबन लागू करण्यात आले आहे. मनीषा मांढरे या २००२ पासून अकरावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना जीवशास्त्र विषय शिकवत होत्या.

एनटीए प्रमुखांना समन्स  : नीट-यूजी २०२६ पेपरफुटी प्रकरणावरून देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संसदीय स्थायी समितीने एनटीएचे अध्यक्ष प्रदीप कुमार जोशी आणि शिक्षण मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे. २१ मे रोजी या विषयावर चर्चा  होणार आहे.

Web Title : नीट घोटाला: सीबीआई को एक हजार छात्रों द्वारा पेपर खरीदने का संदेह; नागपुर का आलोक रडार पर

Web Summary : सीबीआई को संदेह है कि एक हजार छात्रों ने नीट का पेपर खरीदा। नागपुर का आलोक जांच के दायरे में है। पुणे और लातूर में गिरफ्तारियां हुईं। नांदेड़ कनेक्शन में एक महिला द्वारा अपनी बेटी के लिए पेपर खरीदने का मामला सामने आया। कोचिंग क्लास बंद, निदेशक फरार। प्रोफेसर निलंबित।

Web Title : NEET Scam: CBI Suspects Thousand Students Bought Paper; Nagpur's Alok Under Scanner

Web Summary : CBI suspects a thousand students bought the NEET paper. Nagpur's Alok is under investigation. Arrests made in Pune and Latur. Nanded connection surfaces with a woman buying the paper for her daughter. Coaching classes shut down, directors absconding. Professor suspended.