स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 15:46 IST2026-04-14T15:30:09+5:302026-04-14T15:46:21+5:30

Shree Swami Samarth Punyatithi Smaran Din 2026: श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. जाणून घ्या...

Shree Swami Samarth Punyatithi Smaran Din 2026: श्री स्वामी समर्थांचे श्रेष्ठत्व वर्णन करण्यास कोणत्याही भाषेतील शब्द थिटे पडतात. प्रत्यक्ष परब्रह्माला शब्दात कसे पकडणार? स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही. परंतु, जेव्हा कृपा होते, शुभाशिर्वाद मिळतात, स्वामींचे अनुभव येतात, तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते.

श्री स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन बुधवार, १५ एप्रिल २०२६ रोजी आहे. या दिवशी अनेक शुभ योग, राजयोग जुळून आहेत. सूर्य उच्च राशीत असणार आहे. तर मीन राशीत त्रिग्रही योग जुळून आलेला आहे. या दिवशी पंचकही असणार आहे.

एकूण ग्रहमान पाहता तुमच्यासाठी हा कालावधी कसा असू शकेल, स्वामींचे कालातीत शुभाशिर्वाद आणि लक्ष्मी देवीच्या कृपेचे वरदान कोणत्या राशींना लाभू शकेल, जाणून घेऊया...

मेष: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. मनातील एखादी इच्छा पूर्ण होईल. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. सोयी-सुविधांमध्ये वाढ होईल. कामाचा ताण असला तरी फायदे होणार असल्याने कामाचे काही वाटणार नाही. आर्थिक आवक चांगली राहील. मात्र, देवाणघेवाण करताना थोडी खबरदारी घ्यावी. अतिसाहस करण्याच्या फंदात पडू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. प्रवासात वस्तू, कागदपत्रे जपा.

वृषभ: चांगले अनुभव देणारा काळ ठरेल. योगायोगाच्या घटना घडलीत, चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. त्यामुळे कामात व्यस्त राहाल. घरातील कामांसाठी वेळ द्यावा लागेल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. जमिनीचे व्यवहार लाभ देणारे ठरतील. मात्र, थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. संयमाने वागण्याची गरज आहे.

मिथुन: नवीन नोकरी मिळेल. अनुकूल वातावरण राहील. प्रारंभी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. तसेच इतरांच्या भानगडीत पडू नका. वादविवादात पडू नका. काहींना प्रवास करावा लागेल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नका. अडचणी दूर होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना मुलाखतीचे बोलावणे येईल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. धनलाभ होईल.

कर्क: यश मिळेल. संयम बाळगण्याची गरज आहे. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. त्यातून हातून चुका होऊ शकतात. वाहन हळू चालवा. अनुकूलता बाजूने राहील. चांगल्या बातम्या कळतील. मौजमजा करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च कराल. पर्यटन घडेल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. मान-सन्मान मिळेल. नोकरीत वर्चस्व प्रस्थापित करण्यात यश मिळेल.

सिंह: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळली पाहिजे. लोकांच्या भानगडीत पडू नका. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. वाहन जपून चालवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. मध्यस्थी करू नका. अनुकूलता राहील. अडचणी हळूहळू दूर होतील. समाजात महत्त्व वाढेल.

कन्या: योजना गुप्त ठेवा. साधक-बाधक अनुभव येतील. काही कामे झटपट होतील तर काही कामे रखडली जातील. एखादी चांगली बातमी कळेल. जवळचे प्रवास होतील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. अचानक धनलाभ होऊ शकतो. झेपतील तेवढीच कामे करा, शांत चित्ताने नेहमीची कामे करा.

तूळ: नवी जबाबदारी मिळेल. चांगला काळ जाईल. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. वेळापत्रक व्यस्त होऊन जाईल. त्यातून प्रगती होईल. काहींना प्रवास घडून येतील. मुलांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे वाढवू नका. आरोग्याची काळजी घ्यावी. हितशत्रू डोके वर काढतील. थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. व्यावसायिक उत्कर्ष होईल. नवीन माहिती कळेल.

वृश्चिक: कामाचा ताण राहील. काळ घडामोडींचा राहील. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. ग्राहकांचा प्रतिसाद चांगला राहील. मात्र, आपल्यावर कामाचा ताण राहील. भावंडांच्या भेटीगाठी होतील. जवळचे प्रवास होतील. नोकरीत कामाचे स्वरूप बदलेल. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. घरातील सदस्यांशी गैरसमज होऊ शकतात. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. नवीन कामात व्यस्त राहाल. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील.

धनु: चांगले अनुभव येतील. चंद्राचे भ्रमण अनुकूल राहील. चांगले अनुभव येतील. महत्त्वाची कामे होण्यास काही अडचण राहणार नाही. आर्थिक आवक चांगली राहील. व्यावसायिक करार मदार करताना मात्र थोडी खबरदारी घ्यावी. गुंतवणूक करताना काळजी घ्यावी. नोकरीत नवीन संधी मिळेल. योग्यतेची दखल घेतली जाईल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगला काळ आहे.

मकर: धनलक्ष्मीची कृपा राहील. अडचणी दूर झालेल्या असतील. त्यामुळे हलके-हलके वाटेल. आवडते छंद जोपासण्यासाठी वेळ देता येईल. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांचे बोलणे मनावर घेऊ नका, व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. भावंडांच्या सहवासात मजेत वेळ जाईल.

कुंभ: खर्चावर नियंत्रण ठेवा. थोडी दगदग होईल. अवास्तव अपेक्षा ठेवल्यास निराशा येऊ शकते. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कायद्याची बंधने काटेकोरपणे पाळा. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. परिस्थिती आटोक्यात येईल. आर्थिक आवक चांगली राहील. मालमत्तेचे व्यवहार करताना थोडी खबरदारी घ्यावी. दुसऱ्यांशी बरोबरी करू नका. भावंडांच्या भेटीगाठी होतील. त्यांच्यासाठी वेळ द्याल.

मीन: संमिश्र ग्रहमान राहील. अनुकूलता तुमच्या बाजूने राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. एखादे काम सहजपणे पूर्ण होईल. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. चोरी, नुकसानीपासून सावध राहा. लोकांना मोठमोठी आश्वासने देऊ नका. अडचणी दूर होतील, मनात सकारात्मक विचार राहतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.