अधिक मास शनि नक्षत्र गोचर २०२६: ८ राशींना वरदान काळ, चौफेर चौपट लाभ; भरघोस भरभराट, शुभ घडेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 18:03 IST2026-05-15T18:03:09+5:302026-05-15T18:03:09+5:30

Adhik Maas Shani Nakshatra Gochar May 2026: शनि नक्षत्र गोचराने अद्भूत दुर्मिळ त्रिवेणी महासंयोग जुळून आलेला आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

Shani Gochar In Revati Nakshatra May 2026: नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह नक्षत्र परिवर्तन करत आहे. शनिवारी शनि जयंती कालावधीत शनि रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनि हा शेवटचा ग्रह मानला गेला असून, शेवटच्या रेवती नक्षत्रात शनि प्रवेश करणार आहे. आताच्या घडीला शनि शेवटच्या म्हणजेच मीन राशीत विराजमान आहे.

Adhik Maas Shani Nakshatra Gochar May 2026: १७ मे २०२६ रोजी शनि रेवती नक्षत्रात प्रवेश करणार आहे. याच दिवशी अधिक मास सुरू होत आहे. मराठी वर्षात यंदा ज्येष्ठ महिना अधिक मास असणार आहे. त्यामुळे अधिक मास सुरू होतानाच होत असलेले शनिचे गोचर अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. ऑक्टोबर २०२६ पर्यंत शनिचे गोचर असणार आहे.

Shani Jayanti Shani Nakshatra Gochar May 2026: शेवटचा ग्रह, शेवटच्या नक्षत्रात गोचर आणि शेवटची राशीत विराजमान असणे हा त्रिवेणी योग अतिशय महत्त्वाचा मानला जात आहे. शनिचा कर्मकारक ग्रह आहे. अनेक राशींसाठी अधिक मासातील मीन राशीतील शनिचे रेवती नक्षत्र गोचर अनुकूल, सकारात्मक ठरू शकते, असे म्हटले जात आहे. या कालावधी काही उपाय करणे रामबाण मानले जात आहे. जाणून घ्या...

मेष: या काळात थोडे एकटे वाटू शकते आणि खर्चाचा भार वाढू शकतो. पण काळजी करू नका. स्वतःला अंतर्मनातून समजून घेण्यासाठी आणि जुन्या भावनिक जखमा भरून काढण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. कोणतेही काम अपूर्ण सोडू नका किंवा कोणत्याही गोष्टीपासून पळून जाऊ नका. अति रागामुळे समस्या निर्माण होऊ शकतात. करिअरमध्ये प्रगतीसाठी अनेक महत्त्वपूर्ण संधी मिळतील. परदेश प्रवासाचीही शक्यता आहे. उपाय: ॐ शाम शनैश्चराय नमः या मंत्राचा जप करा.

वृषभ: अनेक वर्षांच्या मेहनतीला आता फळ येऊ लागेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. व्यावसायिक प्रतिष्ठा वाढेल. फक्त धीर धरा. यश कायमस्वरूपी टिकेल. दीर्घकाळापासूनची इच्छा पूर्ण होऊ शकते. ज्या लाभांची वाट पाहत आहात, ते मिळू लागतील. नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी हा काळ शुभ असेल. उपाय: काळे तीळ दान करा. शिस्तीशी तडजोड करू नका.

मिथुन: कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांचा डोंगर वाढू शकतो, ज्यामुळे कामाचा भार वाढेल. जर कठोर परिश्रमापासून पळ काढला नाहीत, तर प्रगती निश्चित आहे. वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. कालांतराने नोकरी आणि व्यवसायात यश मिळेल. मान-सन्मान मिळेल. शत्रूंवर विजय मिळवाल. वडिलोपार्जित मालमत्तेचा वारसा मिळण्याचीही दाट शक्यता आहे. उपाय: वडीलधाऱ्यांचा आदर करा. कामात प्रामाणिक राहा. ऋण्मोचक हनुमान स्तोत्राचे पठण करणे शुभ राहील.

कर्क: भाग्योदयाला विलंब होऊ शकतो. परदेश प्रवासाच्या किंवा शिक्षणाच्या योजनांना अडथळा येऊ शकतो. तत्त्वांचे पुनर्मूल्यांकन करण्याची ही वेळ आहे. कालांतराने नशिबाची साथ मिळेल. छुपे शत्रू ओळखता येतील. आळस सोडून आयुष्यात पुढे जावे लागेल. जीवनसाथीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी विवाह होण्याचीही शक्यता आहे. कोणतीही समस्या सहजपणे हाताळू शकाल. उपाय: शनि मंत्राचा जप करा. गुरूंचे आशीर्वाद घ्यावे. ५, ११, २१ वेळा हनुमान चालिसा म्हणणे शुभ राहील.

सिंह: आयुष्यात काही मोठे आणि आकस्मिक बदल घडू शकतात. पैशांच्या बाबतीत जोखीम घेणे टाळा. भावनांवर नियंत्रण ठेवा. जुने प्रश्न सोडवण्यासाठी ही योग्य वेळ आहे. हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो. जुनी अपूर्ण कामे समस्या निर्माण करू शकतात. आर्थिक आणि नातेसंबंधांमध्येही आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. उपाय: शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावा. हनुमान मंदिरात जाऊन हनुमान चालिसा आणि तुळशीची माळ यांचे वाटप करावे.

कन्या: नात्यांमधील जबाबदाऱ्या वाढतील. जोडीदारासोबत समन्वय साधण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. व्यवसायातही सावधगिरी बाळगा. गांभीर्यपूर्ण स्वभाव नातेसंबंध अधिक दृढ करेल. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल. तसेच पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे. स्पर्धा परीक्षेसंदर्भात चांगली बातमी मिळू शकते. परंतु, मित्रांकडून विश्वासघात होण्याची शक्यता आहे. उपाय: संभाषणात सौम्यता राखा.

तूळ: आव्हानांना सामोरे जाण्याची शक्ती मिळू शकेल. कामाच्या आणि आरोग्याच्या बाबतीत पूर्वीपेक्षा अधिक शिस्तबद्ध राहाल. शत्रू इजा पोहोचवू शकणार नाहीत, फक्त दिनचर्या कायम ठेवा. प्रतिस्पर्धकांपेक्षा नेहमीच पुढे राहाल. सभोवतालच्या गुप्त घडामोडींवर चिंता करत वेळ वाया घालवू नका; त्याऐवजी, जीवनात पुढे जाण्यावर लक्ष केंद्रित करा. उपाय: गरजूंना मदत करा. दैनंदिन वेळापत्रकाचे पालन करा. पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावणे शुभ राहील.

वृश्चिक: प्रेम जीवनात गंभीर वळण येऊ शकते. विद्यार्थ्यांना यश मिळवण्यासाठी अभ्यासात अधिक मेहनत घ्यावी लागेल. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेणे टाळा. प्रलंबित कामे पूर्ण होतील. शिक्षण, मुले आणि प्रेमसंबंधांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. पैसा विचारपूर्वक खर्च करा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. उपाय: भगवान हनुमानाची पूजा करा. कामावर लक्ष केंद्रित करा. सुंदरकांडाचे पठण करा. हनुमानाच्या चरणांवरील टिळा लावावा.

धनु: कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढू शकतात, ज्यामुळे मानसिक शांततेत काही चढ-उतार होऊ शकतात. जमीन किंवा घरगुती बाबींना काही वेळ लागू शकतो. मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. हा काळ चांगला असणार आहे. धन आणि समृद्धी मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करण्याचीही संधी आहे. आजार, कर्ज आणि शत्रू नाहीसे होतील. नोकरी आणि व्यवसायात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उपाय: गरिबांना अन्नदान करावे. घरात शांतता राखा. हनुमान मंदिरात जाऊन बुंदीचे लाडू आणि गोड विड्याची पाने अर्पण करा.

मकर: आत्मविश्वास वाढेल. प्रयत्नांना फळ येऊ लागेल. लोकांशी संवाद वाढेल. छोटे प्रवास करिअरसाठी फायदेशीर ठरतील. एकंदरीत, हा काळ अनुकूल राहील. शिक्षण सोडू नये किंवा मुलांच्या शिक्षणाशी संबंधित कोणत्याही समस्या हलक्यात घेऊ नयेत. उपाय: शनि मंत्राचा जप करा. कठोर परिश्रम सुरू ठेवा. आळस झटकून कामाला प्राधान्य देणे हिताचे राहील.

कुंभ: आता पैसे वाचवणे हे प्राधान्य असले पाहिजे. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, अन्यथा कठोर शब्दांमुळे नातेसंबंधांमध्ये ताण येऊ शकतो. संपत्तीची वाढ हळू पण निश्चित होईल. आर्थिक लाभ आणि कौटुंबिक पाठिंब्याच्या संधी मिळतील. जीवन संघर्ष आणि लाभांनी भरलेले असेल. धातूशी संबंधित व्यवसाय फायदेशीर ठरतील. संयम आणि धैर्याने काम करा. उपाय: कठोर शब्द टाळा. शनिवारी काळ्या वस्तू दान करा. हनुमान अष्टक स्तोत्राचे पठण करणे लाभदायक ठरेल.

मीन: व्यक्तिमत्त्वाच्या संपूर्ण परिवर्तनाचा काळ ठरू शकतो. जबाबदाऱ्या वाढतील. पूर्वीपेक्षा अधिक गंभीर व शिस्तबद्ध जीवन होऊ शकेल. हा काळ भविष्यासाठी एक अधिक कणखर व्यक्ती बनवेल. गुपिते उघड होऊ शकतात. घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींपुढे किंवा अधिकाऱ्यांपुढे अहंकार दाखवणे टाळा. कृतींवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनाकडे थोडे अधिक लक्ष देण्याची गरज भासू शकते. उपाय: नियमित ध्यान करा. शनि देवाची पूजा करा. शनिवारी सुंदरकांडाचे पठण करा. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.