Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:52 IST2026-05-14T11:51:17+5:302026-05-14T11:52:50+5:30

BJP Sambit Patra And Congress Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या परदेशवाऱ्यांचा संपूर्ण रेकॉर्ड जनतेसमोर मांडला आहे.

Congress Rahul Gandhi foreign BJP Sambit Patra questions foreign trips expenses | Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा सवाल

Sambit Patra : "२२ वर्षांत ५४ परदेश दौरे, राहुल गांधींच्या ट्रिपचा खर्च ६० कोटी"; कमाईवरुन भाजपाचा सवाल

काँग्रेस नेते राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांवरून भाजपाने त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत त्यांच्या परदेशवाऱ्यांचा संपूर्ण रेकॉर्ड जनतेसमोर मांडला आहे. भाजपाचे नेते संबित पात्रा यांनी यावरून निशाणा साधला आहे. राहुल गांधी गेल्या २२ वर्षांत ५४ वेळा परदेश दौऱ्यावर गेले असून, त्यावर तब्बल ६० कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. राहुल यांच्या या दौऱ्यांचं 'फंडिंग' कोणी केलं असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपा नेते संबित पात्रा यांनी गुरुवारी राहुल गांधींच्या परदेश दौऱ्यांची सविस्तर माहिती जनतेला दिली. पात्रा यांच्या म्हणण्यानुसार, राहुल गांधी यांनी २००४ ते २०२६ या काळात एकूण ५४ पर्सनल परदेश दौरे केले आहेत. यामध्ये अमेरिका, इटली, युनायटेड किंगडम, जर्मनी, व्हिएतनाम, कंबोडिया, सिंगापूर, बहरीन, मालदीव, कतार आणि यूएई या देशांचा समावेश आहे. याशिवाय, ३ मे रोजी ते कोणतीही पूर्वकल्पना न देता मस्कत (ओमान) येथे गेले होते, ज्याचं फुटेज सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

"तब्बल ६० कोटी रुपये खर्च"

राहुल यांच्या या दौऱ्यांवर तब्बल ६० कोटी रुपये खर्च झाल्याचा दावा पात्रा यांनी केला आहे. या दौऱ्यांमध्ये सरकारी किंवा संसदीय समित्यांच्या दौऱ्यांचा समावेश करण्यात आलेला नाही. संबित पात्रा पुढे म्हणाले की, राहुल यांचे बहुतांश दौरे ऑन-रेकॉर्ड आहेत, ज्याच्या तारखा, तपशील, प्रेस इटिनरी , संसदीय रेकॉर्ड आणि मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध आहेत. तरीही या दौऱ्यांचे फंडिंग पूर्णपणे सीक्रेट ठेवण्यात आलं आहे.

"कमाईपेक्षा परदेश दौऱ्यांवर अधिक खर्च"

संबित पात्रा यांनी राहुल गांधींच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राचा (फॉर्म २६) हवाला देत सांगितलं की, गेल्या १० वर्षांत त्यांचं एकूण घोषित केलेलं उत्पन्न ११ कोटी रुपये आहे. याउलट त्यांच्या परदेश दौऱ्यांचा खर्च ६० कोटी रुपये इतका आहे. राहुल गांधी आपल्या कमाईपेक्षा कितीतरी पटीने अधिक पैसे परदेश दौऱ्यांवर खर्च करत असल्याचा आरोप भाजपाने केला आहे. जर उत्पन्न मर्यादित आहे, तर या प्रचंड खर्चाचं फंडिंग कोण करत आहे आणि यामध्ये कोणत्याही परदेशी सोर्सचा हात आहे का? असा प्रश्न पात्रा यांनी विचारला आहे.

"एकाच ट्रिपवर ४.५ कोटी खर्च"

भाजपाने २०१५ मधील एका विशिष्ट दौऱ्याचं उदाहरण देत राहुल गांधींना धारेवर धरलं. पात्रा यांच्या मते, २०१५ मध्ये राहुल गांधी दक्षिण-पूर्व आशियात गेले होते, जिथे एकाच ट्रिपवर ४.५ कोटी रुपये खर्च झाले. विशेष म्हणजे, त्या वर्षी राहुल गांधींचं वार्षिक उत्पन्न केवळ ८६.५५ लाख रुपये होतं. म्हणजेच त्यांनी आपल्या वर्षभराच्या कमाईपेक्षा ५.२ पट जास्त पैसे एकाच परदेश दौऱ्यावर खर्च केले. भाजपाने याला 'घोषित केलेलं उत्पन्न आणि प्रवासावरील खर्च यातील तफावत' असं म्हटलं आहे.

Web Title : भाजपा का राहुल गांधी पर हमला, विदेश यात्राओं पर ₹60 करोड़ खर्च?

Web Summary : भाजपा ने राहुल गांधी के 22 वर्षों में 54 विदेश दौरों पर ₹60 करोड़ खर्च करने का आरोप लगाया और फंडिंग स्रोत पर सवाल उठाया। भाजपा का दावा है कि यात्रा खर्च उनकी घोषित आय से अधिक है।

Web Title : BJP questions Rahul Gandhi's foreign trips, alleges ₹60 crore expense.

Web Summary : BJP alleges Rahul Gandhi spent ₹60 crore on 54 foreign trips in 22 years, questioning the funding source. They claim his travel expenses far exceed his declared income, raising concerns about transparency and potential foreign involvement.