Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:03 IST2026-05-14T08:47:04+5:302026-05-14T10:03:54+5:30

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

Maharashtra Marathi News Live Updates 14 May 2026: PM Narendra Modi Appeal, Fuel Prices in India, Gold Prices, Donald Trump in China, US Israel Iran War, Striat of Hormuz, CM Devendra Fadnavis, TCS Case, IPL 2026, NEET exam Paper Leak, Ashok Kharat Case | Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार

Top Marathi News Live Updates: ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार

महाराष्ट्रासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स...

LIVE

Get Latest Updates

14 May, 26 : 11:54 AM

शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी वाळवा तालुक्यात बाईक रॅली

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुका संघर्ष समिती आणि शेतकऱ्यांच्या वतीने शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी बाईक रॅली काढण्यात आली. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील शिवाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून या बाईक रॅलीस सुरुवात झाली.

14 May, 26 : 11:48 AM

सेल्स गर्लचा १.६६ कोटींवर डल्ला!

अहमदाबादमधील निकोल परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मोठ्या ज्वेलरी शोरूममध्ये काम करणारी सेल्स गर्ल चक्क दीड कोटीहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने घेऊन पसार झाली आहे. चोरीची ही संपूर्ण घटना शोरूममध्ये बसवण्यात आलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी तरुणीचा शोध सुरू केला आहे. वाचा सविस्तर 

14 May, 26 : 11:02 AM

हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये संशयास्पद वस्तू ठेवणारा आरोपी CCTV मध्ये कैद

पुणे : हडपसर परिसरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता संशयित आरोपीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो इलेक्ट्रिक स्कूटरवरून रुग्णालयात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने अतिदक्षता विभागाच्या (ICU) शेजारील पुरुष स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे. (सविस्तर वाचा)

14 May, 26 : 10:30 AM

संभ्रम अखेर दूर..! आषाढी वारीत ज्ञानेश्वर माउलींचा मुक्काम यंदाही भवानी पेठेतच

आळंदी - आळंदी श्री संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पुणे मुक्कामाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला संभ्रम अखेर दूर झाला आहे. प्रशासनाने आवश्यक उपाययोजनांची लेखी हमी दिल्यानंतर यंदाही पालखीचा मुक्काम पुण्यातील भवानी पेठेतील श्री विठ्ठल मंदिरातच होणार असल्याचे संस्थान कमिटीने स्पष्ट केले.  (सविस्तर वाचा)

14 May, 26 : 09:54 AM

‘नीट’ प्रकरणात लातुरात सहा जणांची चौकशी

लातूर : नीट प्रकरणात लातूर पोलिसांनी बुधवारी सहा जणांची चौकशी केली. त्यात समुपदेशक, विद्यार्थी, कोचिंग क्लासेस संबंधित व्यक्ती अशा एकूण सहा जणांचे जबाब नोंदविण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
 

14 May, 26 : 09:47 AM

४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला टीपर लॉरीची धडक, एक ठार, अनेकजण जखमी

आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील देवरापल्ले मंडल अंतर्गत येणाऱ्या येरा गुडेम राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटेच्या सुमारास एक भीषण रस्ते अपघात घडला. एका खासगी ट्रॅव्हल्स बसला टिपर लॉरीने जोराची धडक दिली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.

14 May, 26 : 09:15 AM

बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून, बीजिंगमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल'बाहेर शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांचे स्वागत केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत व्यापार, तंत्रज्ञान स्पर्धा आणि इराण युद्धासारख्या गुंतागुंतीच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होत असून, संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे. (सविस्तर वाचा)

14 May, 26 : 09:14 AM

साखर निर्यातीला 'ब्रेक'! देशातील भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय

देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने साखरेच्या निर्यातीवर ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत किंवा पुढील आदेशापर्यंत बंदी घातली आहे. कच्ची आणि रिफाइंड अशा दोन्ही प्रकारच्या साखरेवर हे निर्बंध लागू असतील. विशेष म्हणजे, कालच सरकारने सोन्या-चांदीच्या आयात शुल्कात मोठी वाढ केल्यानंतर आता साखरेबाबत घेतलेला हा निर्णय महागाई रोखण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जात आहे. (सविस्तर वाचा)

14 May, 26 : 09:07 AM

सोने तब्बल २७ हजारांनी महाग होणार

पश्चिम आशियातील युद्ध, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि घसरत चाललेला रुपया यामुळे केंद्र सरकारने सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी वाढ केली आहे. बुधवारी सरकारने सोने आणि चांदीवरील आयात शुल्क ६ टक्क्यांवरून थेट १५ टक्क्यांपर्यंत वाढवले. यामुळे देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर आणखी भडकण्याची शक्यता असून १० ग्रॅममागे सुमारे २७ हजार रुपयांची वाढ होऊ शकते, असा अंदाज सराफा उद्योगाने व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा

14 May, 26 : 09:04 AM

महागाईचा झटका! मुंबईत सीएनजीची दरवाढ

मुंबई महानगर क्षेत्रातील लाखो वाहनधारकांसाठी चिंतेची बातमी आहे. महानगर गॅस लिमिटेडनं (MGL) सीएनजीच्या दरात प्रति किलो २ रुपयांची वाढ केली आहे. ही दरवाढ १४ मे २०२६ रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून लागू करण्यात आली आहे.

14 May, 26 : 09:02 AM

बीजिंगमध्ये ट्रम्प-शी जिनपिंग यांची ऐतिहासिक भेट

जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या चीन दौऱ्यावर असून, बीजिंगमध्ये त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. 'ग्रेट हॉल ऑफ द पीपल'बाहेर शी जिनपिंग यांनी ट्रम्प यांचे स्वागत केल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये द्विपक्षीय बैठक सुरू झाली आहे. या बैठकीत व्यापार, तंत्रज्ञान स्पर्धा आणि इराण युद्धासारख्या गुंतागुंतीच्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा होत असून, संपूर्ण जगाचे लक्ष या भेटीकडे लागले आहे.

सविस्तर वाचा

Web Title: Maharashtra Marathi News Live Updates 14 May 2026: PM Narendra Modi Appeal, Fuel Prices in India, Gold Prices, Donald Trump in China, US Israel Iran War, Striat of Hormuz, CM Devendra Fadnavis, TCS Case, IPL 2026, NEET exam Paper Leak, Ashok Kharat Case