घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:28 IST2026-05-14T11:26:47+5:302026-05-14T11:28:03+5:30

तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी व्हायला हवा, पण त्याचा वापर जेव्हा एखाद्याला बदनाम करण्यासाठी होतो, तेव्हा ते किती घातक ठरू शकतं, ...

Husband commits disgusting act during divorce case; wife shocked as she narrated the incident to police | घटस्फोटाच्या केस दरम्यान पतीने केलं किळसवाणं कृत्य; पत्नीने पोलिसांना आपबिती ऐकवताच सगळे हादरले

AI Generated Image

तंत्रज्ञानाचा वापर प्रगतीसाठी व्हायला हवा, पण त्याचा वापर जेव्हा एखाद्याला बदनाम करण्यासाठी होतो, तेव्हा ते किती घातक ठरू शकतं, याचं भयावह उदाहरण अंबिकापूरमध्ये पाहायला मिळालं आहे. एका पतीने आपल्या पत्नीचा सूड घेण्यासाठी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' तंत्रज्ञानाचा गैरवापर करत तिचे अश्लील व्हिडिओ तयार केले आणि ते सोशल मीडियावर व्हायरल केले. याप्रकरणी पीडित पत्नीने पुराव्यांसह पोलीस ठाणे गाठले असून, पोलिसांनी आरोपी पतीविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित महिलेचा विवाह २०१३ मध्ये झाला होता. मात्र, गेल्या काही काळापासून पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. हा वाद इतका विकोपाला गेला की प्रकरण न्यायालयात पोहोचले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा घटस्फोटाचा खटला न्यायालयात प्रलंबित आहे. याच कायदेशीर लढाईदरम्यान पत्नीला समाजात बदनाम करण्याच्या हेतूने पतीने हे घृणास्पद कृत्य केले.

इन्स्टाग्रामवर व्हिडिओ पाहून पायाखालची जमीन सरकली

१० मे रोजी सकाळी जेव्हा पीडित महिलेने तिचे इन्स्टाग्राम अकाउंट उघडले, तेव्हा तिला मोठा धक्का बसला. तिच्या फोटोंसोबत छेडछाड करून एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने अश्लील व्हिडिओ तयार करण्यात आले होते. तपासाअंती तिला समजले की, हे व्हिडिओ तिच्या पतीनेच स्वतःच्या इन्स्टाग्राम आयडीवरून अपलोड केले आहेत.

पुराव्यांसह गाठलं पोलीस स्टेशन

पतीने आपल्याला मानसिक त्रास देण्यासाठी आणि प्रतिष्ठा धुळीस मिळवण्यासाठी हा कट रचल्याचा आरोप महिलेने केला आहे. आरोपीने संध्याकाळपर्यंत हे व्हिडिओ डिलीट केले असले, तरी तोपर्यंत महिलेने व्हिडिओचे स्क्रीनशॉट आणि तांत्रिक पुरावे गोळा केले होते. हे सर्व पुरावे तिने पोलिसांच्या हवाली केले आहेत.

गुन्हा दाखल, पोलिसांकडून तपास सुरू

कोतवाली पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी पतीविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७७, ७९, ३५६ आणि आयटी ॲक्टच्या कलम ६६ ई व ६७ अंतर्गत एफआयआर दाखल केला आहे. पोलीस आता सायबर तज्ज्ञांच्या मदतीने आरोपीच्या डिजिटल फुटप्रिंट्सचा तपास करत आहेत.

Web Title: Husband commits disgusting act during divorce case; wife shocked as she narrated the incident to police