Pune Video: 'तो' नेमका कोण ? हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये संशयास्पद वस्तू ठेवणारा आरोपी CCTV मध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:56 IST2026-05-14T10:51:47+5:302026-05-14T10:56:20+5:30

Pune Hospital Bomb Scare: घटनेनंतर रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली

Pune Crime Who exactly is 'he'? Accused of keeping suspicious items in Hadapsar hospital caught on CCTV | Pune Video: 'तो' नेमका कोण ? हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये संशयास्पद वस्तू ठेवणारा आरोपी CCTV मध्ये कैद

Pune Video: 'तो' नेमका कोण ? हडपसरच्या हॉस्पिटलमध्ये संशयास्पद वस्तू ठेवणारा आरोपी CCTV मध्ये कैद

पुणे : हडपसर परिसरातील एका नामांकित खासगी रुग्णालयात बॉम्बसदृश्य वस्तू आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आता संशयित आरोपीचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, तो इलेक्ट्रिक स्कूटरवरून रुग्णालयात आल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपीने अतिदक्षता विभागाच्या (ICU) शेजारील पुरुष स्वच्छतागृहात संशयास्पद वस्तू ठेवल्याची माहिती तपासातून पुढे आली आहे.



घटनेनंतर रुग्णालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. रुग्ण, त्यांच्या नातेवाईकांसह कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली होती. माहिती मिळताच पुणे पोलिस, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक (BDS) तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संपूर्ण परिसर सील करून तपास सुरू केला. प्राथमिक तपासात संशयास्पद वस्तूमध्ये टायमर यंत्रणा असल्याचे समोर आले. सूत्रांच्या माहितीनुसार, या यंत्रणेवर तब्बल सात तासांचा टायमर सेट करण्यात आला होता. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाली होती. बीडीएस पथकाने अत्यंत काळजीपूर्वक तपास करत जवळपास सात तासांच्या प्रयत्नांनंतर ही वस्तू सुरक्षितरीत्या ताब्यात घेतली.

या घटनेमुळे रुग्णालयातील काही विभागांमध्ये हालचाल मर्यादित करण्यात आली होती. काही रुग्णांना सुरक्षिततेच्या कारणास्तव अन्य विभागात हलवण्यात आल्याची माहितीही समोर येत आहे. दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असणाऱ्या मोठ्या खासगी रुग्णालयात अशी घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

दरम्यान, ही वस्तू नेमकी कोणी ठेवली आणि त्यामागचा उद्देश काय होता, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. रुग्णालयातील कर्मचारी, सुरक्षा रक्षक आणि संबंधित व्यक्तींची चौकशी केली जात आहे. उपचारातील वाद, वैयक्तिक राग, आर्थिक कारण किंवा धमकी अशा विविध शक्यतांवर पोलिस तपास करत आहेत.  पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास यंत्रणा आरोपीचा शोध घेत असून, लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Web Title : हडपसर अस्पताल में संदिग्ध वस्तु रखने वाला आरोपी सीसीटीवी में कैद

Web Summary : पुणे के अस्पताल में बम की दहशत! संदिग्ध सीसीटीवी में संदिग्ध वस्तु छोड़ते हुए कैद। पुलिस मकसद की जांच कर रही है: व्यक्तिगत द्वेष, वित्तीय विवाद या धमकी। जांच जारी।

Web Title : Suspect Placing Object in Hadapsar Hospital Caught on CCTV

Web Summary : Bomb scare at Pune hospital! Suspect caught on CCTV leaving suspicious object. Police investigate motive: personal grudge, financial dispute, or threat. Investigation ongoing.