मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:28 IST2026-05-14T15:25:59+5:302026-05-14T15:28:16+5:30

Vaishakh Masik Shivratri Vrat 2026: सलग दुसऱ्या दिवशी महादेव शिवशंकरांची उपासना करण्याची सुवर्ण संधी आहे. कशी? जाणून घ्या...

vaishakh masik shivratri may 2026 lord shiva will fulfill your wishes you will get success prosperity know about vrat puja vidhi and significance in marathi | मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!

मासिक शिवरात्रि व्रत २०२६: महादेव मनोकामना पूर्ण करतील, यश मिळेल, सुख लाभेल; ‘असे’ करा व्रत!

Vaishakh Masik Shivratri Vrat 2026: शनिवारी वैशाख अमावास्या आहे. याच दिवशी शनैश्चर जयंती साजरी केली जाणार आहे. यानंतर वैशाख महिन्याची सांगता होऊन १७ मे २०२६ पासून अधिक मास सुरू होत आहे. यंदाच्या मराठी वर्षाचे विशेष आणि अत्यंत महत्त्वाचा कालावधी म्हणजे अधिक महिना. तत्पूर्वी, शुक्रवारी वैशाख मासिक शिवरात्रि व्रत आहे. सलग दोन दिवस शिव उपासना करण्याची सुवर्ण संधी प्राप्त होणार आहे. 

गुरुवारी गुरु प्रदोष व्रत झाल्यानंतर शुक्रवारी मासिक शिवरात्रि आहे. ही दोन्ही व्रते शिवाला समर्पित आहेत. शिवरात्रीला महादेव शिवशंकराचे विशेष पूजन केले जाते. प्रत्येक मराठी महिन्यातील वद्य चतुर्दशीला शिवरात्रि असते. अनेकांचे आराध्य असलेल्या महादेवांचे भारतात मोठ्या प्रमाणात पूजन, उपासना केली जाते. शिवभक्तांच्या दृष्टीने अत्यंत पवित्र असे एक व्रत.  रात्री शंकराची पूजा केली असता सर्व प्रकारच्या पापांचा नाश होऊन शिवलोकाची प्राप्ती, शिवाशी तादात्म्य, मोक्ष अशी फळे मिळतात, अशी शिवभक्तांची श्रद्धा असते. 

‘असे’ करा मासिक शिवरात्रि व्रत

शुक्रवार, १५ मे २०२६ रोजी वैशाख शिवरात्रि व्रत आहे. या दिवशी सकाळी शिवमंदिरात जाऊन महादेवांचे दर्शन घ्यावे. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करतात. या दिवशी मनोभावे शिवपूजन करावे. पंचोपचाराने महादेवांचे पूजन झाल्यानंतर धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. त्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी रुद्राभिषेक, जलाभिषेक, दुग्धाभिषेक करणे पुण्य फलदायी मानले गेले आहे. शक्य असल्यास १०८ बिल्वपत्रे महादेवांना अर्पण करावीत. 

कोणत्या शिव मंत्रांचा जप करणे प्रभावी ठरू शकेल?

वैशाख मासिक शिवरात्रिला महादेव शिवशंकरांच्या प्रभावी मंत्रांचे जप करणे लाभदायक तसेच पुण्यफलदायी ठरू शकते, असे म्हटले जाते. 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे, असे सांगितले जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा किमान १०८ वेळा किंवा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. 

॥ ॐ नमः शिवाय ॥

॥ हर हर महादेव ॥

 

Web Title : वैशाख मासिक शिवरात्रि २०२६: मनोकामना पूर्ति, सफलता और सुख प्राप्ति व्रत।

Web Summary : 15 मई, 2026 को वैशाख मासिक शिवरात्रि, शिव पूजा का सुनहरा अवसर है। व्रत रखें, मंदिर जाएँ और पंचोपचार पूजा करें। 'ओम नमः शिवाय' का जाप और रुद्राभिषेक अत्यंत फलदायी हैं। मनोकामना पूर्ति और आशीर्वाद के लिए शिव के गायत्री और महामृत्युंजय मंत्रों का जाप करें।

Web Title : Vaishakh Masik Shivratri 2026: Fulfill desires, gain success, and find happiness.

Web Summary : Vaishakh Masik Shivratri on May 15, 2026, offers a golden opportunity for Shiva worship. Observe the fast, visit a temple, and perform Panchopachara puja. Chanting 'Om Namah Shivaya' and Rudrabhishek are highly beneficial. Recite Shiva's Gayatri and Mahamrityunjaya mantras for fulfillment and blessings.