Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 15:19 IST2026-05-14T15:17:34+5:302026-05-14T15:19:32+5:30
उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत चक्रीवादळ-पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. प्रयागराज जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यातील मृतांचा आकडा १०१ झाला आहे.

Video - हाहाकार! उत्तर प्रदेशमध्ये मुसळधार पाऊस अन् भीषण चक्रीवादळ; १०१ जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात गेल्या २४ तासांत चक्रीवादळ-पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. प्रयागराज जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला असून संपूर्ण राज्यातील मृतांचा आकडा १०१ झाला आहे. जीवितहानीसोबतच मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही झालं आहे. लोकांची कच्ची घरं आणि पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः या घटनेची दखल घेत पीडितांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत.
कौशाम्बी जिल्ह्यात झाड कोसळल्याने एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला, तर कोखराज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरसौरा गावात वादळामुळे उडालेल्या ठिणगीने भीषण आग लागली. या आगीत १२ घरं जळून खाक झाली आहेत. प्रयागराज - २१, भदोही - १८, मिर्झापूर - १७, फतेहपूर - १०, उन्नाव - ६,
बदायूं - ६, प्रतापगड: ४, बरेली - ४, सीतापूर - ३, चंदौली - २, कानपूर देहात - २, संभल - २, रायबरेली - २, हरदोई - १, सोनभद्र - १, कौशांबी - १, रामपूरमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.
कल उत्तरप्रदेश और बिहार में अंधी तूफान में लगभग 95 लोगों की मौत हो गई है.
— Sajid (@sajid_reja) May 14, 2026
सबसे ज्यादा मौत प्रयागराज (17) और भदोही (16) हुई है.
ये वीडियो बरेली की है. pic.twitter.com/yyZvsBT1C9
निसर्गाचा कहर
कौशांबी जिल्ह्यातही वादळाने मोठं नुकसान केलं आहे. येथे सैनी कोतवालीच्या कसारी गावात झाडाची फांदी अंगावर पडल्याने एकाचा मृत्यू झाला. तर कोखराज परिसरातील तरसौरा गावात आगीत १२ घरं जळून खाक झाली आणि एका पाळीव प्राण्याचा होरपळून मृत्यू झाला. स्थानिक ग्रामस्थांनी सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवलं. हवामान विभागाने पुढील काही दिवसांसाठी पुन्हा इशारा जारी केला आहे.
UP में आंधी तूफान का कहर,
— The Rashtra Doot (@therashtradoot) May 14, 2026
आंधी, तूफान, आकाशीय बिजली से 60 लोगों की मौत
प्रयागराज में 14, भदोही में 12, फतेहपुर में 7 की मौत,
उन्नाव में 6, बरेली में 4, सीतापुर में 3 लोगो की हुई मौत
CM योगी 24 घंटे में मुआवजा देने का दिया निर्देश, #tufan#uttarpradesh#CMYogi#news#Thunderstormpic.twitter.com/6YTkKZ4ium
वेगवेगळ्या जिल्ह्यांत मोठं नुकसान
संपूर्ण राज्यात पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. कच्ची घरं आणि पत्र्याची शेड असलेली दुकानं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. बरेली जिल्ह्यात वादळामुळे एक माणूस हवेत उडाल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राज्यातील या भीषण परिस्थितीची दखल घेत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सर्व जिल्ह्यांमध्ये तातडीने मदत पोहोचवण्याचं आणि नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कामात कोणतीही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला आहे.