Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 10:44 IST2026-05-14T10:43:00+5:302026-05-14T10:44:52+5:30
बिअर पिणाऱ्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात, असे नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे.

Netherlands Research: तुम्ही बिअर पिता का? मग डास तुम्हालाच जास्त चावणार; जाणून घ्या त्यामागचं कारण!
नेदरलँड्समधील शास्त्रज्ञांनी केलेल्या एका अभ्यासांतून काही रंजक तथ्ये समोर आली आहेत. बिअर पिणाऱ्या व्यक्तींकडे डास अधिक आकर्षित होतात, असे सिद्ध झाले आहे. संशोधकांनी इशारा दिला आहे की, केवळ बिअर प्रेमीच नव्हे, तर गर्भवती महिलांनाही डास अधिक चावतात. दरम्यान, ४६५ व्यक्तींवर करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले की, ज्या व्यक्तींनी गेल्या २४ तासांत बिअरचे सेवन केले होते, त्यांच्याकडे बिअर न पिणाऱ्यांच्या तुलनेत १.३५ पट अधिक डास आकर्षित झाले.
बिअर प्यायल्यामुळे मानवी शरीराचे तापमान वाढते, जे डासांना लांबूनच जाणवते. अल्कोहोलमुळे श्वसनाचा वेग बदलतो आणि शरीरातून कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते. बिअरच्या सेवनामुळे शरीराचा नैसर्गिक गंध बदलतो, जो डासांना आमंत्रण देणारा ठरतो. अनेकांचा असा समज असतो की, विशिष्ट ब्लड ग्रुप असलेल्या लोकांना डास जास्त चावतात. मात्र, फ्रान्समधील 'इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च फॉर डेव्हलपमेंट'चे शास्त्रज्ञ फ्रेडरिक सिमार्ड यांनी हा दावा फेटाळून लावला. त्यांच्या मते, रक्ताचा प्रकार किंवा डोळ्यांचा रंग यांचा डासांशी संबंध नसून, शरीरातून उत्सर्जित होणारी रसायने महत्त्वाची ठरतात.
मानवी शरीर शेकडो रसायने उत्सर्जित करते. त्यापैकी मशरूम अल्कोहोल हे रसायन डासांना आकर्षित करण्यात सर्वात प्रभावी ठरते. ज्यांच्या शरीरात या रसायनाचे प्रमाण अधिक असते, त्यांना डास जास्त चावतात. बिअर प्यायल्यामुळे शरीराचे तापमान वाढते, कार्बन डायऑक्साइडचे उत्सर्जन वाढते आणि शरीराचा नैसर्गिक गंध बदलतो. नेदरलँड्सच्या शास्त्रनांनी एकूण ४६५ लोकांवर केलेल्या संशोधनानुसार, सामान्य लोकांच्या तुलनेत बिअर पिणाऱ्या लोकांना जास्त प्रमाणात जास्त चावतात. केवळ बिअर प्रेमीच नव्हे, तर गर्भवती महिलांनाही डास अधिक चावतात. या संशोधनातून असे स्पष्ट होते आहे की, शरीराचा गंध आणि शरीरातून उत्सर्जित होणारी रसायने यांमुळेच डास आपल्याकडे आकर्षित होतात.
दरम्यान, हवामान बदलामुळे हा धोका आणखीच वाढला आहे. डास आता अशा प्रदेशांमध्येही पसरू लागले आहेत, जिथे यापूर्वी त्यांची उपस्थिती नगण्य होती. टायगर मॉस्किटो हा डास चिकुनगुनियासारखे आजार पसरवण्यासाठी ओळखला जातोय, तो आता थंड हवामान अशलेल्या प्रदेशात असलेल्या प्रदेशांमध्येही पोहोचला आहे.