Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा

या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा

Cuba Oil Crisis: जनजीवन विस्कळीत; अन्नधान्य अन् औषधांचाही तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 11:10 IST2026-05-14T11:09:47+5:302026-05-14T11:10:32+5:30

Cuba Oil Crisis: जनजीवन विस्कळीत; अन्नधान्य अन् औषधांचाही तुटवडा

Cuba Oil Crisis: not a single drop of petrol and diesel left in cuba; Government announces 'blackout' | या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा

या देशात पेट्रोल-डिझेलचा एकही थेंब उरला नाही; सरकारने केली 'ब्लॅकआउट'ची घोषणा

Cuba Oil Crisis: कॅरिबियन देश क्युबा सध्या इतिहासातील सर्वात भीषण ऊर्जा संकटाचा सामना करत आहे. देशातील पेट्रोल-डिझेलचा साठा जवळजवळ संपला असून, राजधानी हवानासह संपूर्ण देश अंधारात बुडाला आहे. परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, अनेक भागांत नागरिकांना दिवसातील २० ते २२ तास वीज कपातीचा सामना करावा लागत आहे. क्युबाचे ऊर्जा मंत्री व्हिसेंट डी लाओ यांनी सरकारी प्रसारमाध्यमांशी बोलताना या धक्कादायक परिस्थितीची कबुली दिली आहे.

राष्ट्रीय ग्रिड कोलमडण्याच्या मार्गावर

ऊर्जा मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाकडे आता इंधनाचा कोणताही साठा शिल्लक नाही. राष्ट्रीय वीज ग्रिडची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, सध्या कोणताही राखीव साठा शिल्लक नसल्याने वीजपुरवठा करणे अशक्य झाले आहे. सध्या देशाचा वीज ग्रिड केवळ स्थानिक कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि मर्यादित अपारंपारिक ऊर्जेच्या जोरावर कसातरी सुरू ठेवला जात आहे.

जनजीवन विस्कळीत; अन्नाचा आणि औषधांचा तुटवडा

क्युबातील जनता आधीच अन्नधान्य, औषधे आणि जीवनावश्यक वस्तूंच्या टंचाईने त्रस्त आहे. अशातच आता दिवसातील बहुतांश वेळ वीज नसल्यामुळे लोकांचे हाल अधिकच वाढले आहेत. ही परिस्थिती गेल्या अनेक दशकांतील सर्वात वाईट ऊर्जा आणीबाणी मानली जात आहे.

सौर ऊर्जेचा वापर वाढला, पण मर्यादा... 

गेल्या दोन वर्षांत क्युबाने आपली सौर ऊर्जा क्षमता सुमारे १,३०० मेगावॅटपर्यंत वाढवली आहे. मात्र, इंधनाची प्रचंड कमतरता आणि ग्रिडमधील तांत्रिक अस्थिरतेमुळे या सौर ऊर्जेचा पूर्ण क्षमतेने वापर करणे कठीण झाले आहे. वीज निर्मिती केंद्र आणि वितरण व्यवस्थेच्या खराब स्थितीमुळे ही समस्या अधिकच जटील बनली आहे.

मित्र राष्ट्रांनी फिरवली पाठ; इंधन पुरवठा ठप्प

क्युबाच्या या परिस्थितीला जागतिक राजकारणही कारणीभूत ठरले आहे. ऊर्जा मंत्र्यांनी स्पष्ट केले की, क्युबा कोणत्याही देशाकडून इंधन खरेदी करण्यास तयार आहे. मात्र, पूर्वी मदत करणारे मेक्सिको आणि व्हेनेझुएला यांसारख्या देशांनी जानेवारी २०२६ मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नवीन आदेशांनंतर क्युबाला इंधन पाठवणे बंद केले आहे. यामुळे क्युबाची कोंडी झाली असून देश मोठ्या संकटात सापडला आहे.

Web Title : ईंधन भंडार खत्म होने से क्यूबा में ब्लैकआउट: गहराता संकट

Web Summary : क्यूबा गंभीर ऊर्जा संकट से जूझ रहा है क्योंकि ईंधन भंडार घट रहा है, जिससे व्यापक ब्लैकआउट हो रहे हैं। घटती आपूर्ति और रुकी हुई सहायता के साथ राष्ट्रीय ग्रिड की अस्थिरता, निराशाजनक स्थिति को बढ़ा रही है। संकट ने दैनिक जीवन को बाधित कर दिया है, जिससे भोजन और दवा जैसी आवश्यक चीजों की कमी हो गई है।

Web Title : Cuba Faces Blackout as Fuel Reserves Exhausted: A Crisis Unfolds

Web Summary : Cuba is grappling with a severe energy crisis as fuel reserves dwindle, triggering widespread blackouts. National grid instability, coupled with dwindling supplies and halted aid, exacerbate the desperate situation. The crisis has disrupted daily life, causing shortages of essentials like food and medicine.