काही सेकंदांत 100 किमीचा वेग पकडतात या कार...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 10:47 PM2018-09-15T22:47:08+5:302018-09-15T22:50:54+5:30

कोणत्या कारला जास्त पिकअप ही बाब कार सुरु केल्यापासून किती सेकंदात 100 किमीचा वेग पकडते यावर ठरते. टाटाची सफारी स्टॉर्म या श्रेणीतल्या कारवर मात करते. 2.2 लीटरची टर्बो डिझेल इंजिनची कार 0 ते 100 किलोमीटर एवढा वेग केवळ 12.8 सेकंदात घेते. हा वेग जास्त वाटत नसेल तर आता स्कॉर्पिओ, एसयुव्ही 500 सारख्या कारचा वेग पाहू.

भारतात अशा काही कार आहेत, ज्या सामान्य वाटतात पण आहेत शक्तीशाली. जर तुम्ही या कार वापरल्याच नसतील तर कळणारही नाही की त्या एवढ्या शक्तीशाली आहेत. चला भारतातील अशा वेगवान कार पाहू...

टोयोटाने इटियॉस क्रॉस ही कार थोडी उशिराने लाँच केली. ही कार 11 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते.

ह्युंदाई वेर्ना या कारचा वेगही 11 सेकंदामध्ये 100 किमीचा आहे. या कारमध्ये 1.5 लीटरचे सीआरडीआय इंजिन लावलेले आहे.

टोयोटाची ही कार पाहून असे वाटणार नाही की ही वार वेगवान आहे. कंपनीचा दावा आहे की 1.5 लीटर पेट्रोल इंजिनवाली इटियॉस कार 11.4 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते.

मारुती सुझुकीची एस क्रॉस ही प्रिमिअम लूकवाली कार 1.6 लीटर डिझेल इंजिनद्वारे 11.3 सेकंदात 100 किमीचा वेग पकडते.