वृक्षारोपणाचे महत्त्व पटून वृक्षारोपण ही चळवळ व्हावी, या उद्देशाने जिंतूर तालुक्यातील पुंगळा येथील युवकांनी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धनाच्या जनजागरणासाठी गणेशमूर्तीसमोर तब्बल १४०० रोपांची आरास केली आहे. ...
नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे के ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते, याचा धसका शासनाच्या विविध विभागांनी घेतला असून गेल्या १५ दिवसांत जवळपास १०० कोटी रुपयांच्या विकासकामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत. यामध्ये बहुतांश कामे ही बांधकाम विभागाशी संबंधित आहेत. ...
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी सोमवारी संप पुकारला होता़ त्यामुळे दोन्ही विभागांचे कामकाज ठप्प राहिले़ या संपाला शिक्षकांनीही पाठिंबा देत जिल्ह्यातील शाळा सोडून दिल्या़ ...
अमरगड हे बंजारा समाज बांधवांचे अत्यंत पवित्र ठिकाण असून, या तीर्थस्थळाच्या विकास कामांसाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे़ या अंतर्गत विकास कामांना सुरुवात केली असल्याची माहिती आ़ विजय भांबळे यांनी दिली़ ...