परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2019 12:29 AM2019-09-11T00:29:59+5:302019-09-11T00:31:17+5:30

नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़

Parbhani: Most farmers suicide in five years | परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

परभणी : पाच वर्षांत सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जिंतूर (परभणी) : नोटबंदी आणि जीएसटीसारख्या निर्णयाने सर्वसामान्यांना देशोधडीला लावण्याचे काम भाजप सरकारने केले आहे़ या सरकारच्या काळातच शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. त्यामुळे हे सरकार सामान्यांच्या हिताचे नाही, अशी टीका खा़ सुप्रिया सुळे यांनी येथे केली़
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त खा़ सुप्रिया सुळे १० सप्टेंबर रोजी येथे आल्या होत्या़ यानिमित्त जिल्हा परिषद मैदानावर झालेल्या सभेस हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़ यावेळी खा़ सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली़ शेतकरी कर्जमाफी व शेतकºयांच्या आत्महत्यांबाबत सरकारला देणे-घेणे नाही़ शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे़ संपूर्ण देशात नोटाबंदी लागू केल्यानंतर अर्थव्यवस्था कोलमडली असून, व्यापार ठप्प झाला आहे़ हाताला काम नाही, बेरोजगारी वाढली, शेतकºयांची कर्जमाफी नाही़ अशा परिस्थितीत सामान्य माणसाला जीवन जगणे कठीण झाले आहे़ या परिस्थितीला हे सरकारच जबाबदार असून, या सरकारला धडा शिकविण्याची वेळ आली आहे, असे त्या म्हणाल्या़ विजय भांबळे यांच्यासारखे आमदार तुम्हाला मिळाले आहेत़ त्यामुळे मतदार संघाचा विकास होत आहे़ त्यांना पुन्हा विधानसभेत पाठवा व मतदारसंघाचा कायापालट करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले़ कार्यक्रमास शिवचरित्र व्याख्याते प्रा़ यशवंत गोसावी, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश उपाध्यक्ष छगन शेरे, जि़प़ अध्यक्षा उज्ज्वलाताई राठोड, सारंगधर महाराज, जि़प़ सदस्या शालिनीताई राऊत, इंदूबाई घुगे, मीनाताई राऊत, अरुणा काळे, संगीता घोगरे, नमिता बुधवंत, ममता मते, अजय चौधरी, बाळासाहेब रोडगे, सभापती इंदुमती भवाळे, उपसभापती विजय खिस्ते, नगराध्यक्षा सबिया बेगम कपिल फारुखी, उपनगराध्यक्ष बाळासाहेब भांबळे यांच्यासह पंचायत समितीचे सर्व सदस्य, नगरसेवक, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि हजारोंच्या संख्येने नागरिक उपस्थित होते़
५०० कोटींपेक्षा अधिक निधी खेचून आणला- विजय भांबळे
४आ़ विजय भांबळे म्हणाले, निवडून आल्यापासून मतदारसंघ कधीही सोडला नाही़ सातत्याने दौरे केले़ त्यामुळे नागरिकांचे प्रश्न समजू लागले़ हे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला़ त्यातूनच विविध योजनांच्या माध्यमातून जिंतूर मतदारसंघासाठी ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी खेचून आणला़
४तालुक्यातील रस्ते, शिक्षण, वीज, आरोग्य आदी प्रश्न सोडविण्यासाठी कधीही कमी पडला नाही़ जनतेच्या कामांसाठी माझ्या कार्यालयाचे दरवाजे २४ तास उघडे असतात, असे सांगून जिंतूर तालुक्यातील काही लोक निवडणुकीपुरते मतदारसंघात फिरतात़ त्यानंतर पाच वर्षे गायब होतात, असा आरोप आ़ भांबळे यांनी केला़

Web Title: Parbhani: Most farmers suicide in five years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.