पुणे येथील प्रसिद्ध सतारवादक अनिरुद्ध जोशी यांनी त्यांच्या अनोख्या शैलीत केलेल्या सतारवादनाने माघी उत्सवाच्या दुसऱ्या दिवशीचे पुष्प गुंफले. रसिक श्रोत्यांनी या मैफलीला मनमुराद दाद दिली. ...
हृदयविकाराचा झटका आला तर रुग्णाच्या जवळचे सर्वच घाबरून जातात. परंतु, अशा परिस्थितीत घाबरून न जाता योग्य उपचार करून रुग्णावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने उपचार केले तर अत्यवस्थ रुग्णांनाही जीवनदान मिळणे शक्य असल्याचे ...
शास्त्रीय संगीत ते भक्तिसंगीत अशा सुमधुर आणि प्रयोगशील स्वरांची मेजवानी सकाळच्या प्रसन्न काळी रसिकांना अनुभवण्यास मिळाली. निमित्त होते सूरविश्वास मैफलीत सुप्रसिद्ध गायक पं. मकरंद हिंगणे यांचे गायन. सूरविश्वासचे सहावे पुष्प त्यांनी गुंफले. ...
पारंपरिक पद्धतीच्या व्यासपीठीय भाषणाला दूर सारत शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी सिडकोत झालेल्या सभेत चक्क खुर्चीवर उभे राहून जनसंवाद साधला आणि आगामी विधानसभेसाठी जनआशीर्वादही मागितले. ...
महापालिकेतील राजकारणात वर्चस्ववादासाठी स्थायी समिती हे कळीचे स्थान ते आपल्या हाती राहावे यासाठी भाजपातील प्रस्थापितांनी प्रयत्न केले खरे, परंतु दरवेळी ज्यांना काँग्रेसमधून आले असे हिणवले गेले त्याच गटाची सरशी झाली आणि उद्धव निमसे यांना मानाचे पान मिळ ...
दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रात ६० ‘आपला दवाखाना’ मंजूर केले आहेत. त्यातील १० दवाखाने शहरात उघडले जातील. गोरगरिबांची मोठी वस्ती असणाऱ्या भागात हे दवाखाने सुरू करण्यात येणार असून (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ...
गेल्या काही महिन्यांपासून स्मार्ट सिटी करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्ही म्हणजेच कंपनीचा कारभार वादग्रस्त ठरू लागला आहे. मध्यंतरी संचालकांनीच बैठकीवर बहिष्कार घातला. आता याच कंपनीचे संचालक शाहू खैरे यांनी कंपनी बरखास्त करण्याची मागणी केली आहे. ...
ग्रामीण भागात भूजल सर्वेक्षण करून बोअरवेल करण्यासाठी तरी काही नियम आहेत, परंतु शहरी भागात मात्र तसे कोणतेही निर्बंध नाही. त्यामुळे अनेक सोसायटी आणि बंगल्यांच्या आवारात मोठ्या प्रमाणात कूपनलिका होत आहेत. त्यातच जल पुनर्भरणाची कोणतीही व्यवस्था गांभीर्य ...
शिंदे गाव, माणिक चौक येथे मुलीने शाळेचा गणवेश व वह्या-पुस्तकांसाठी पैसे मागितल्याचा राग आल्याने दारूच्या नशेत असलेल्या पित्याने मुलीला व मुलाला बळजबरीने विषारी औषध पाजून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. ...
गेल्या काही दिवसांपासून चाळीस ते पन्नास रुपये प्रतिजुडी दराने विक्री होणाऱ्या मेथी भाजीची मागील दोन दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारभावात घसरण झाली आहे. शनिवारी (दि.२०) नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या मेथी जुडीला पंधराशे रुपये शेकडा ...