जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
बॅटरीचे स्क्रॅप विकत घेणाऱ्या कळमन्यातील एका व्यावसायिकाला बंगळुरूमधील तिघांनी १२.२४ लाखांचा गंडा घातला. नागपुरातील ओळखीच्या कमिशन एजंटने या फसवणुकीत मुख्य भूमिका वठविली. या चौघांविरुद्ध कळमना पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. ...
गंभीर आजार आणि त्याचा वैद्यकीय उपचाराचा खर्च न पेलवणाऱ्या गोरगरीब रुग्णांसाठी महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना फायद्याची ठरत असली तरी या योजनेतील कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याने याचा फटका रुग्णांना बसत आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हा प्र ...
शहरातील अवैध मोबाईल टॉवरचा त्रास होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असल्याने अनधिकृत वा नाहरकत प्रमाणपत्र न घेतलेल्या मोबाईल टॉवरचा वीजपुरवठा खंडित करण्याचे निर्देश महावितरणला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिले. ...
कोराडी येथे श्री महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिर परिसराचा विकास आराखड्यानुसार भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. भाविकांसाठी सुमारे नऊ कोटी रुपये खर्च करुन बसडेपोची उभारणी करण्यात आली आहे. या परिसरातील विविध भागात भाविकांना जाणे ...
६० वर्षांच्या वरील अंगणवाडी सेविकांना सेवा देण्यासाठी शासनाने फिटनेस टेस्ट आवश्यक केली आहे. यासाठी त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयातून फिटनेसचे प्रमाणपत्र आवश्यक केले आहे. यासाठी त्यांची गायनिक टेस्ट करण्यात येत आहे. या टेस्टवर अंगणवाडी कर्मचारी संघ ...
पंजाबी रॅप गायक यो यो हनीसिंगने थायलंड, दुबई व ऑस्ट्रेलियात जाण्याची परवानगी मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही देशात त्याचे कार्यक्रम आहेत. त्याच्या अर्जावर मंगळवारी सुनावणी होणार आहे. ...
शहरात स्वच्छता अभियान राबविले जात असतानाच गांधीबाग झोनमध्ये घाण व कचरा आढळून आल्याने नाराजी व्यक्त करीत महापालिका आयुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी गांधीबाग झोनच्या अधिकाऱ्याला निलंबित केले आहे. तसेच दोन अधिकाऱ्यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आल्या. ...
अनैतिक संबंधातून एका महिलेने तिच्या मुलाच्या मदतीने आपल्या प्रियकराची हत्या केली. रविवारी मध्यरात्रीनंतर जरीपटक्यात झालेल्या या थरारक हत्याकांडाचा सोमवारी सकाळी उलगडा झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी महिला तसेच तिच्या मुलाला अटक केली आहे. ...